तरुण भारत

प्रभाग रचना, आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा

फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात घोषणा शक्य; मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुकीची शक्यता

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा या महिन्याच्या शेवटी किंवा फेबुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 81 प्रभागांची प्रारूप रचना आणि आरक्षणप्रक्रिया झाल्यानंतर त्यावर आलेल्या हरकतींवर गुरूवार 21 जानेवारीला सुनावणी झाली. आता या सुनावणीवरील अंतिम अहवाल 27 जानेवारीला राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. अहवाल मिळताच त्यावरील अंतिम मोहर उमटवल्याबद्दलची अधिसूचना काढली जाणार आहे. अधिसूचना जाहीर केल्यानंतर निवडणूक तारीख जाहीर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभागरचना आणि आरक्षणासंदर्भातील अधिसूचना जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करेल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या मतदानाच्या आधी चाळीस दिवस निवडणूक तारीख, कार्यक्रम जाहीर होत असतो. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Advertisements

संभ्रमामुळे इच्छुक थंडावले

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने महापालिका निवडणुकीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखेविषयी अस्पष्टता असल्याने इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या हालचालीही थंडावल्या आहेत. पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर या हालचालींना वेग येणार आहे.

Related Stories

नागठाणेत कोरोनाचा शिरकाव होण्याची धास्ती

Abhijeet Shinde

राजारामच्या सभासदाभिमुख योजनांवर टीका म्हणजे सभासद विरोधी भूमिका

Abhijeet Shinde

बटरफ्लाय पॉईंट होणार कुलूपबंद

Patil_p

…म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय! : राज ठाकरे

Rohan_P

Raigad landslide: ४४ मृतदेह काढले बाहेर; आख्खं गाव स्मशानात बदललं

Abhijeet Shinde

जागतिक कुक्कुटपालन” परिषदेसाठी पारगावच्या युवा संशोधकाची भरारी !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!