तरुण भारत

सात्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात

थायलंडमधील ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा

बँकॉक / वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिक पदकाचे दावेदार सात्विकराज रणकिरणरेड्डी व चिराग शेट्टी यांचे टोयोटा थायलंड ओपन सुपर 1000 स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत उभयतांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास उत्कंठावर्धक राहिला होता.

जागतिक क्रमवारीतील 10 व्या मानांकित सात्विकराज व चिराग यांना जागतिक क्रमवारीतील नवव्या मानांकित ऍरॉन शिया व सोह वूई यिक या मलेशियन जोडीविरुद्ध 18-21, 18-21 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. ही लढत 35 मिनिटे चालली होती. यापूर्वी थायलंडमध्येच सात्विक-चिराग जोडीने सुपर 500 स्पर्धेचे जेतेपद संपादन केले होते.

या जोडीने सुपर 1000 इव्हेंटमध्ये 2018 व 2019 मध्येही सहभाग घेतला होता. पण, यंदा प्रथमच ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले. अर्थात, मलेशियन जोडीने अधिक दक्ष, सरस खेळ साकारल्याने त्यांना उपांत्य फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. वास्तविक, उपांत्य फेरीत भारतीय जोडीने प्रारंभी 4-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, नंतर मलेशियन जोडीने बरोबरी मिळवली व पुढे गेमही जिंकला.

त्यांनी 11-10 ची आघाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. भारतीय जोडीने एकवेळ 15-16 अशी किंचीत सरस स्थिती मिळवली. मात्र, निर्णायक टप्प्यात मलेशियन प्रतिस्पर्ध्यांनी 21-18 अशी बाजी मारली. दुसऱया गेममध्ये भारतीय जोडी पुन्हा एकदा 3-1 ने आघाडीवर होती. पण, येथेही मलेशियन जोडीने सलग 4 गुण घेत 7-3 अशी आघाडी मिळवली. यापुढे सात्विक व चिराग यांना ही पिछाडी भरुन काढण्यात शेवटपर्यंत यश मिळाले नाही. अंतिम टप्प्यात त्यांनी 4 मॅच पॉईंटस वाचवले. पण, चिरागचा एक फटका नेटमध्ये गेला आणि मलेशियन जोडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

Related Stories

महेंद्रसिंग धोनीचा मोर्चा आता सेंद्रीय शेतीकडे!

Patil_p

वनडेतील कोहली, रोहितची स्थाने कायम

Omkar B

सुर्यकुमारशी स्लेजिंग केल्याने विराटवर टीका

Patil_p

खोटय़ा वयाच्या दाखल्याची कबुली देणाऱया क्रिकेटपटूंना शिक्षा नाही

Patil_p

सर्बियाचे फुटबॉल प्रशिक्षक ऍन्टीक कालवश

Patil_p

वॉर्नच्या सर्वोत्तम विश्व वनडे संघात सचिन, सेहवागला स्थान

Patil_p
error: Content is protected !!