तरुण भारत

वकील असल्याची बतावणी करून सव्वा लाखाचा गंडा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

वकिल असल्याची बतावणी करून शहरातील फगरवठार येथील इसमाला सव्वा लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े आशिष अनिल घाग (55, ऱा फगरवठार रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या इमसाचे नाव आह़े याप्रकरणी त्यांनी दोघां संशयितांविरूद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े

सुरेश गुप्ता व निधी अशी या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीत यांनी 21 जानेवारी 2021 रोजी मोबाईलवर फोन केल़ा यावेळी आरोपी यांनी आपण वकिल असल्याची बतावणी केली होत़ी तसेच तक्रारदार यांना फूस लावण्यासाठी एम़ के इंटरप्रायझेस या कंपनीच्या इमेल आयडीवरून मेल केला होत़ा यावेळी तक्रारदार यांना आमिष दाखूवन 1 लाख 19 हजार रूपये उकळल़े याप्रकरणी शहर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े

Related Stories

जि.प. ने आरोग्य यंत्रणा सक्षम करावी!

NIKHIL_N

सिंधुदुर्गात आणखी तीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

NIKHIL_N

वेंगुर्ल्यातील ‘लाईटहाऊस’ अंधारात

NIKHIL_N

बेपत्ता महिलेची झाली कुटुंबियांशी भेट

NIKHIL_N

तब्बल पाच महिन्यांनी लालपरी जिह्याबाहेर

Patil_p

राजन साळवी यांच्या प्रयत्नामुळे लांजा तालुक्याचे क्रीडा संकुल पूर्णत्वास येणार

triratna
error: Content is protected !!