तरुण भारत

शृंगारतळीत पाकीट चोरास व्यापाऱयांनी पकडले!

वार्ताहर/ गुहागर

गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतील आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या पालपणे-कुंभारवाडी येथील सुभद्रा पडवेकर या महिलेचे सोळा वर्षिय चोरटय़ाने पाकीट चोरून पोबारा केला. मात्र त्याचा पाठलाग करून येथील व्यापाऱयांनी त्या चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शनिवारी सकाळी 11.30च्या सुमारास पालपणे फाटा येथील पुलावर घडली.

   हा पाकीट चोर मुलगा अज्ञान आहे, परंतु त्याच्याबरोबर त्यांची मोठी टीमही आहे. हा मुलगा मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. यापूर्वीही आठवडा बाजारात अशाप्रकारच्या अनेक चोऱया झाल्या. मात्र आज हा चोर पकडला गेल्याने या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो. त्या चोराला आठवडा बाजारातील व्यापारी नरेंद्र रामा चिपळूणकर, प्रविण रजपूत तसेच पाटपन्हाळे गावचे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, पत्रकार दिनेश चव्हाण व इतर व्यापाऱयांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतरही हा मुलगा आपले रहाण्याचे ठिकाण पोलिसांना दाखवत नव्हता. किमान एक तास त्याने वेळब रोड, चिखली असे पोलिसांना फिरवले. अखेर पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहिते तसेच होमगार्ड अंकुश कदम व सहकाऱयांनी त्याला घेऊन पोलीस स्टेशनला नेले.

Related Stories

जिह्यात कारोना बाधितांची संख्या 500 पार

Patil_p

अपघातप्रकरणी 16 रेल्वे कर्मचाऱयांची होणार चौकशी?

Patil_p

दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Patil_p

आरटीओ कार्यालय एजंट्सच्या हवाली?

Patil_p

निरीक्षणगृहातून पळालेल्या मुलींशी लग्न करणाऱयासह 5 जणांवर गुन्हा

Patil_p

जिल्हय़ात तब्बल 13 हजार वाहनचालकांना दणका

Patil_p
error: Content is protected !!