तरुण भारत

उघडय़ावरील मॅनहोल धोकादायक

प्रतिनिधी/ बेळगाव

नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा चौकाजवळील मॅनहोल उघडय़ावर असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. आंबेडकर उद्यान ते चन्नम्मा सर्कलकडे जाण्याऱया रस्त्यावरील मॅनहोलमध्ये झाडाच्या फांद्या घालून मॅनहोलला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱया नागरिकांना धोका निर्माण झालेला
आहे.

रात्रंदिवस कित्तूर राणी चन्नम्मा चौकात वाहनधारकांची आणि नागरिकांची नेहमीच गर्दी असते. महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी विविध भागातून बेळगावला येत असतात. मात्र, ज्या ठिकाणी बसमधील प्रवासी उतरतात त्याच जागी मॅनहोलवर झाकण नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.चन्नम्मा चौकात सिग्नल यंत्रणा असल्यामुळे प्रत्येक दोन मिनिटांनी सिग्नलवर वाहनधारकांची गर्दी होते. त्यामुळे पादचाऱयांना मॅनहोलच्या बाजूने जाताना कसरत करावी लागत आहे.

 एखाद्याचा नजरचुकीने या मॅनहोलमध्ये पाय जाऊन अपघात घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे येथील मॅनहोलवर लवकरात लवकर झाकण बसवावे, अशी मागणी वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे.

Related Stories

टपाल दिनानिमित्त जी.जी.चिटणीस शाळेची जागृतीफेरी

Patil_p

कर्नाटकमध्ये रुग्णवाढ सुरूच, मंगळवारी ६,७७७ रुग्णांना डिस्चार्ज

Shankar_P

बेननस्मित शाळेत शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

बेळगाव जिल्हय़ानेही आता अधिक दक्षता घेणे गरजेचे

tarunbharat

जांबोटीतील फोटोग्राफरच्या खुनातील आरोपींना फाशी द्या

Patil_p

टॅक्स संदर्भातील खटल्यांमध्ये तोडगा काढणार

Omkar B
error: Content is protected !!