तरुण भारत

दावोस परिषदेत मोदींचे 28 जानेवारीला भाषण

आजपासून ऑनलाईन परिषद ; दिग्गजांचा सहभाग

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ऑनलाईन दावोस समिट रविवार, 24 जानेवारीपासून सुरू होत आहे. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह जगातील इतर बडय़ा नेत्यांचा सहभाग असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला या परिषदेला संबोधित करणार आहेत. नववर्षातील ही पहिलीच मोठी जागतिक परिषद असल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष यातील निर्णयांकडे असणार आहे. या परिषदेत एक हजारहून अधिक जागतिक नेत्यांचा समावेश असेल. यामध्ये विविध देशांचे प्रमुख, महत्त्वाची खाती सांभाळणारे मंत्री, बडय़ा कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष, बहुपक्षीय संघटनांचे प्रमुख, शैक्षणिक आणि नागरी समाजातील  दिग्गजांचा समावेश असणार आहे.

सहा दिवसांची शिखर परिषद 24 ते 29 जानेवारी दरम्यान चालविली जाईल. भारताच्यावतीने सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 28 जानेवारीला या शिखर परिषदेला संबोधित करतील. याशिवाय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, पेट्रोलियम व पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय आनंद महिंद्रा, सलील पारेख आणि शोभना कामिनेनी हे उद्योजकही या शिखर परिषदेला संबोधित करतील.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक सर्वसाधारण बैठक मे महिन्यात सिंगापूरमध्ये होणार आहे. तत्पूर्वी काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वार्षिक सभेपूर्वी जिनिव्हातील संघटनेकडून ही ऑनलाईन परिषद आयोजित करण्यात आली आहे आहे. त्याला ‘दावोस अजेंडा’ असे नाव देण्यात आले आहे. या परिषदेमध्ये कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक आणि तंत्रज्ञान संबंधित आव्हानांवर विस्तृतपणे चर्चा होणार आहे.

Related Stories

कोचीतील चौथी इमारतही जमीनदोस्त

Patil_p

श्रीनगरमधील हिंदू व्यावसायिकाची दहशतवाद्यांकडून हत्या

Patil_p

मुजाहिद्दीनच्या तिघांना काश्मीरमध्ये अटक

tarunbharat

शिर्डी बंदमुळे भाविकांची गैरसोय

Patil_p

मृत्यूदर 1 टक्क्याखाली आणा !

Patil_p

पश्चिम बंगाल : सरकारने पाचव्यांदा केले लॉक डाऊनच्या नियमात बदल

pradnya p
error: Content is protected !!