तरुण भारत

फेसबुकद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला अटक

आतापर्यंत लुटले 46 लाख रुपये

प्रतिनिधी/ पणजी

फेसबुकवर बनावट खाते उघडून अनेकजणांना लाखो रुपयांना लुटणाऱया संशयिताला सायबर क्राईमच्या पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव स्वप्निल नाईक (वय 25, सावर्डे) असे आहे. संशयिताने फेसबुकवर बनावट खाते उघडले व त्यावर एक सुंदर युवतीचा फोटो अपलोड केला होता. नंतर एका युवकाशी फेसबुकद्वारे संपर्क करून त्याच्याशी सुसंवाद करू लागला होता. पीडित युवकाला आपण युवतीशीच फेसबुकवर चॅटींग करीत असल्याचे वाटत होते. काही दिवसांनंतर संशयिताने पीडित युवकाला लग्नाची मागणी घातली होती. पीडित युवकाने लग्नाला होकार देताच त्यांच्यात पुन्हा चॅटींग सुरु झाले. एक दिवस संशयिताने पीडित युवकाकडे 23 लाख रुपयांची मागणी केली होती. सदर पैसे आपल्या खात्यावर भर, असेही सांगितले होते. पीडित युवक संशयिताच्या जाळय़ात पूर्ण अडकल्याने त्याने सहज 23 लाख रुपये संशयिताने दिलेल्या खात्यावर भरले होते. ऑक्टोबर 2020 महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. गेल्या काही दिवसांपासून संशयिताने फेसबुकवरील बनावट खातेच बंद केल्याने पीडित युवकाला आपण फसल्याची जाणीव झाली व त्याने सायबर क्राईम पोलीस विभागात तक्रार दाखल केली होती.

सायबर क्राईम पोलीस विभागाच्या पोलिसांनी बनावट खात्याबाबत सविस्तर माहिती मिळविली व त्याचा तपास सुरु केला असता पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्याची कसून उलट तपासणी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली आहे. संशयिताने या अगोदरही अशाच प्रकारचे बनावट खाते उघडून आणखीन एका युवकाला 22 लाख रुपयांना लुटले होते. त्यावेळीही संशयिताला अटक केली होती. सायबर क्राईम पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आमिषांना बळी पडू नका

सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांची फसवणूक होत असल्याचे उघड झाले असल्याने सोशल मीडिया माध्यम हाताळताना आज प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज आहे. नागरिकांनी बनावट आमिषांना बळी पडू नये. फेसबुक, वॉट्सअप ही माध्यमे हाताळताना खबरदारी बाळगा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

जादा जागा बळकविण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरु

Patil_p

मडगाव, नजीकच्या परिसरांत अंडय़ांची आवक अचानक वाढली

Patil_p

गोमंतकीय प्रवाशांकडून पैसे घेऊ नये

Omkar B

कोविडसंदर्भात जागृतीऐवजी फैलावास हातभार लागेल

Patil_p

गुल्शन गुसाईच्या अर्जावर आज निर्णय शक्य

Omkar B

कोरोनावर आता लॉकडाऊन हाच उपाय

Omkar B
error: Content is protected !!