तरुण भारत

बेंगळूरला जाणारे ट्रक्टर अडविल्याने शेतकरी संतापले

चन्नम्मा चौक येथे आंदोलन करून सरकारचा निषेध

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकरी बेंगळूर येथे दिल्ली सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पाश्चापूर आणि घोटगाळी (ता. खानापूर) येथून 25 ते 30 ट्रक्टर बेंगळूरकडे रवाना होत होते. मात्र, पोलिसांनी या सर्व ट्रक्टरांची अडवणूक करून त्यांना माघारी धाडले. यामुळे बेळगाव परिसरातील आणि जिह्यातील शेतकरी संघटनांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे सरकारविरोधात आंदोलन करून निषेध नोंदविला.

बेंगळूर येथे 26 मार्च रोजी शेतकरी सरकारचा निषेध म्हणून परेड करणार आहेत. केंद्र सरकारने जे जाचक कायदे काढले आहेत ते रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील 30 विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला राज्यभरातून शेतकरी ट्रक्टर घेऊन रवाना होत आहेत. मात्र, सरकार या ट्रक्टरांची अडवणूक करत आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला.

कित्तूर चन्नम्मा चौक येथे त्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी सिद्धगौडा मोदगी, शिवाजी कागणीकर, ऍड. नागेश सातेरी, प्रकाश नाईक, राजू मरवे, बबन मालाई, जयश्री गुरण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

Related Stories

कै.रावसाहेब गोगटे करेला स्पर्धा 12 मार्च रोजी

Amit Kulkarni

लघु उद्योगाला नवहिंद संस्थेने बळ दिले

Patil_p

कुमारस्वामी लेआऊट परिसरात घरफोडी

Patil_p

किणये ग्राम पंचायतीमध्ये 62 उमेदवार रिंगणात

Patil_p

बँक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम होतेय गायब

Patil_p

हिडकल योजनेतील पंप बसविण्याचे काम पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!