तरुण भारत

दिल्लीच्या खान मार्केट परिसरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीच्या खान मार्केट परिसरात शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सहा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तीन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे. 

खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ ताब्यात घेण्यात आलेले सहा जण बाईकवर बसून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते. बाईक भाड्याने घेऊन ती वेगात बाईक चालविण्याची आम्ही शर्यत लावली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळया देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो, असे स्पष्टीकरण या सहा जणांनी पोलिसांना दिले आहे. 

मात्र, पोलिसांनी या सहा जणांच्या कुटुंबियांचीही चौकशी सुरू केली आहे

Related Stories

लॉकडाउन काळात प्रथमच हवाईप्रवास, श्रमिक पोहोचले गावात

Patil_p

सरसेनापती नियुक्त करणारा भारत 5 वा देश

Patil_p

राज्यात दिवसभरात 148 रुग्णांची भर

Patil_p

‘सिरम’कडून दोन स्वयंसेवकांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस

Patil_p

सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीला स्थगिती

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 142 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!