तरुण भारत

प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आणि गुंतागुंतीचा : दिग्दर्शक रामन रसौली

पणजी/प्रतिनिधी

“द डॉग्स डीड नॉट स्लीप लास्ट नाईट ” हा चित्रपट कथा सांगतो विविध भावनांनी प्रेरित चार विविध जीवनांची . प्रत्येक माणूस संघर्ष करत असतो ,प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आणि गुंतागुंतीचा असतो. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या अनेक कहाण्या आपल्या आजूबाजूला असतात. मला चार कथा सापडल्या , त्या मी या चित्रपटात एकत्र केल्या, असे दिग्दर्शक रामन रसौली यांनी ५१ व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफफीत सांगितले. हा चित्रपट अफगाणिस्तानमधल्या सत्यकथांवर आधारित आहे असे ते म्हणाले.

गोव्यात पणजी इथे आयोजित ५१ व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २३ जानेवारी २०२१ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतराष्ट्रीय स्पर्धा विभागात या चित्रपटाचा काल जागतिक प्रीमियर झाला.

९१ मिनिटांच्या या कथेवर आधारित चित्रपटात अफगाणिस्तानमधला दुर्गम भाग दाखवण्यात आला आहे.
यात एक तरुण मेंढपाळ ,एक पक्षी पकडणारा मुलगा आणि शाळा जळून उद्ध्वस्त झाल्यामुळे दुःखी झालेला शिक्षक यांचं जीवन दाखवण्यात आले आहे.

तरुण मेंढपाळ एका अमेरिकी महिला सैनिकाला जीवदान देऊन आपल्या गावी घेऊन येतो आणि चित्रपट वेगळे वळण घेतो. या चित्रपटाचे चित्रीकरण इराण आणि अफगाणिस्तानमध्ये करण्यात आले असून दारी आणि इंग्रजी भाषेत चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात इराणी आणि अफगाणी कलाकारांनी एकत्र काम केले आहे. हा चित्रपट इराण आणि अफगाणिस्तानची संयुक्त निर्मिती आहे, परंतु अनेक कलाकार अफगाणी आहेत, असे त्यांनी सांगितले. अफगाणीस्तानमधली परिस्थिती चित्रीकरणासाठी अनुकूल नव्हती त्यामुळे चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण इराणमध्ये झाले आहे.

भारतीय आणि जागतिक चित्रपटांच्या प्रेमाविषयी विचारले असता, रामीन यांनी आठवणींना उजाळा देत सांगितले की, प्रत्येक अफगाण व्यक्तीप्रमाणे ते ही भारतीय चित्रपट बघत आणि बॉलिवूडची गाणी ऐकत मोठे झाले आहेत. खरे तर इराणी संस्कृती आणि भारतीय संदर्भांची सरमिसळ तुम्ही माझ्या चित्रपटात पाहू शकता. एक उदाहरण देऊन पुढे ते म्हणाले की, या चित्रपटात जेव्हा पक्षी पकडणारा मुलगा एका टाकीत पक्षासह आश्रय घेतो, तेव्हा तो ऐकत असलेल्या गाण्यांमध्ये बॉलिवूडच्या गाण्यांचाही समावेश आहे.

त्यांनी सांगितले की, भारत आणि अफगाणिस्तान यांचे जवळचे संबंध आहेत. आणि अफगाणीस्तानवर भारतीय संस्कृतीचा वाढता प्रभाव आहे.

महामारीच्या दरम्यान इफफीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करत , इफफीत एक दिग्दर्शक स्वतःचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच बघतो आहे.

इथे आल्यामुळे आनंद झाला.जगातल्या एका मोठ्या चित्रपट महोत्सवात आपला चित्रपट दाखवला जाणे ही माझ्या चित्रपटासाठी एक उत्तम संधी आहे. भारत मला आवडतो , इथे मी पहिल्यांदाच आलो आहे. खरोखर इथल्या वास्तव्याचा मी आनंद घेतला असे रसौली म्हणाले.,

दिग्दर्शक रामन रसौली यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात इराणमधून केली आणि आता ते नेदरलँडमध्ये वास्तव्याला आहेत.चित्रपटसृष्टीत रस असल्यामुळे,वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी लेखन सुरू केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ८ एमएम चा चित्रपट तयार केला.त्यांनी १० लघुपट आणि दोन चित्रपट तयार केले आहेत. लीना ( LINA) या पहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी २०१७ मध्ये महोत्सवांमध्ये प्रवेश केला.’ द डॉग्स डीड नॉट स्लीप लास्ट नाईट ‘ हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे.

Related Stories

गोलरक्षक धीरज सिंग एफसी गोवा संघाशी करारबद्ध

Amit Kulkarni

इफ्फी: चित्रपटामध्ये सर्व प्रकारचे संगीत समावले पाहिजे : प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन

Shankar_P

भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला योग्य मार्गदर्शन करावे

Patil_p

हडफडे सरपंचपदी राजेश मोरजकर बिनविरोध

Omkar B

मडगाव पालिका क्षेत्रात पाच वर्षांत विविध विकासकामे मार्गी

Patil_p

भरती रेषा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू : काब्राल

Omkar B
error: Content is protected !!