तरुण भारत

ईएसझेडमधील खाण परवान्याच्या नूतनीकरणाचा आढावा घेणारः मुख्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

शिवमोगा जिल्ह्यात झालेल्या स्फोटात मृतांचा आकडा सहावर गेला आहे. मात्र, अद्याप पीडित महिलेची ओळख पटलेली नाही.

शनिवारी घटनास्थळाला भेट देत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दगड क्रशर युनिटसाठी देण्यात आलेल्या परवान्याच्या नूतनीकरणावर सरकार विचार करेल. हैदराबादच्या पथकाने स्फोटस्थळी भेट दिली आणि स्फोटाची चौकशी केली जात आहे. याशिवाय उपायुक्त के. बी. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची टीमही या घटनेचा सर्व स्थरातून तपास करत आहे.

बेकायदेशीर खाणकामबाबत त्यांनी राज्यात रस्ते विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दगड क्रशर युनिट अपरिहार्य आहेत. तर, सरकार परवानाधारक खाणीला पाठिंबा देईल. तर अवैध खाणकामांना समर्थन देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान प्रदेशात कार्यरत असलेल्या सर्व स्टोन क्रशर युनिटचा परवाना होता. परंतु तेथे स्फोटके वापरण्यास परवानगी नव्हती. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कोठून आणि का आणले गेले हे या चौकशीतून स्पष्ट होईल. सरकारने घटनेची उच्चस्तरीय निःपक्षपाती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

कर्नाटक सरकारने तालुका पंचायत व्यवस्था रद्द करू नये : आमदार एच. के. पाटील

Shankar_P

मालमत्ता करवाढीचा बसणार धक्का

Patil_p

भाजपचे एम. के. प्राणेश विधानपरिषदेचे नवे उपसभापती

Amit Kulkarni

कर्नाटक : वीरशैव-लिंगायत समाजाला ओबीसी दर्जा देण्याचा निर्णय पुढील बैठकीनंतर

Shankar_P

कर्नाटकात पुन्हा कोरोनाचे एक लाखापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण

triratna

राज्यात बुधवारी ३७८ कोरोनाबाधितांची भर

triratna
error: Content is protected !!