अपघातात तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय : मुरगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद
वार्ताहर / बाळेकुंद्री
भरधाव वेगाने येरगट्टी जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहनच्या बसने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हा अपघात बेळगाव बागलकोट मार्गावरील नेसरगीनजीक चचडी गावच्या वळणावर घडला. या अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी त्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली. यावेळी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त कार व मृतदेह बाहेर काढण्यात आले.