तरुण भारत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिक्षण व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दि. 25 रोजी कोल्हापूर दौऱयावर येणार आहेत. सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठात `उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात होणार आहे. प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 9 वाजता पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.सकाळी 10 वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या समवेत नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या ताराबाई पार्कातील निवास्थानी भेट. सकाळी 11 वाजता विद्यापीठातील दीक्षांत हॉलमध्ये `उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या दारी’ उपक्रमाला उपस्थिती.

सायंकाळी 5 वाजता शिवाजी विद्यापीठात पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता सायबर चौकातील आजी – माजी विद्यार्थी कृती समिती संचलित विद्यार्थी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन. सायंकाळी 6.30 वाजता गांधी मैदान येथील फुटबॉल टर्फ मैदानाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. सायंकाळी 7 वाजता जुना बुधवार पेठ येथे शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत माजी महापौर सरिता मोरे व माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांचा शिवसेना पक्ष प्रवेश. रात्री 8 वाजता शनिवार पेठ येथील जोशी गल्ली कॉर्नर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेला उपस्थिती असा त्यांचा दौरा आहे.यानंतर रात्री उशिरा ते सिंधुदुर्गला रवाना होणार आहेत.

Related Stories

कोल्हापूर : दोन दिवसांत जम्बो टॅंक अर्धा

triratna

महाराष्ट्रात 8,232 रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.71 %

pradnya p

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

pradnya p

कोल्हापूर : कोरोनाचा आणखी एक बळी,पाच वाजेपर्यंत 138 पॉझिटिव्ह

triratna

कोरोना पार्श्वभूमीवर ‘चोराडे’ गावाचा एक अनोखा पॅटर्न-

Patil_p

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समिती सभापती निवड सहा ऑगस्टला

triratna
error: Content is protected !!