तरुण भारत

सलग सुट्ट्यांमुळे पंढपुरात भाविकांची दाटी

पंढरपूर / प्रतिनिधी

सलग आलेली सुट्टी आणि एकादशीमुळे पंढरपूर रविवारी हाऊसफूल्ल दिसून आले. विशेष म्हणजे बऱ्याच महिन्यांनी पंढरपूर विठ्ठलभक्तांनी फुलून गेले होते. शनिवार अन रविवार सुट्टी त्यानंतर येणारा प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये पर्यटक भाविकांनी मोठी दाटी केली. रविवारची सुट्टी आणि एकादशी हे एकाच दिवशी आल्याने साधारणपणे दीड लाखाच्या आसपास भाविकांची गर्दी संपूर्ण शहरात झालेली दिसून आली. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजला होता.

Advertisements

विठ्ठलाचे दर्शन हे ऑनलाईन बुकींग शिवाय देखील सध्या होत आहे. त्यामुळे साहजिकच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून मुखदर्शनाची रांग ही चंद्रभागा घाटाच्या पुढे जाऊन पोहोचली होती. साधारणपणे दोन तासाच्या आसपास भाविकांना दर्शन घडून आले.

रविवारी महिन्याची एकादशी एकाच दिवशी आल्याने प्रदक्षिणा मार्गावर दिंड्यांनी मोठी गर्दी केली. कोरोनामुळे चैत्री, आषाढी आणि कार्तिकी अशा तीनही वाऱ्या चुकलेले वारकरी भक्त आपल्या दिंडीसह एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आले होते. त्यामुळे पहाटेपासूनच चंद्रभागा नदीकाठीदेखील मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे मंदिर परिसरात आणि दर्शन रांगेत मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीने मास्क वापरा अशा वारंवार सूचना देण्यात येत होत्या.

Related Stories

बार्शीत शिक्षकाचा कुटुंबासह अन्नत्याग सत्याग्रह

triratna

जेएनयू हल्ल्याविरोधात समाजकार्य विद्यार्थ्यांची निदर्शने

prashant_c

चिखर्डे गावतळे बनले रोगराईचे केंद्र

Shankar_P

माकपने शहरात विविध ठिकाणी पाळला राष्ट्रीय निषेध दिन

triratna

एस.टी. कर्मचार्‍यांना विमा कवच, सानुग्रह साहय्य 50 लाख रुपये अदा करावे

triratna

सोलापूर : ऊसाची ट्रॉली अंगावर पडून तुंगतमधील एकजण ठार

triratna
error: Content is protected !!