तरुण भारत

अयोध्येतील मशिदीच्या कार्याचा मंगळवारपासून होणार प्रारंभ

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भूखंड प्राप्त

वृत्तसंस्था / अयोया

उत्तरप्रदेशच्या अयोध्येत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्राप्त जमिनीवर 26 जानेवारीपासून मशिदीच्या कार्यास प्रारंभ होणार आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फौंडेशन धन्नीपूर ट्रस्ट 5 एकर भूमीवर वृक्षारोपण आणि ध्वजारोहण करून मशिद निर्मितीच्या कार्याची सुरुवात करणार आहे. धन्नीपूर मशिदीसाठी स्थापन ट्रस्टच्या सदस्यांनी मशिदीच्या जमिनीची पाहणी केली आहे.

26 जानेवारी रोजी 9 विश्वस्तांकडून 9 रोपांची लागवड करून मशिदीच्या कार्याचा शुभारंभ केला जाणार असल्याचे माहिती ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी दिली आहे. त्याच दिवशी याच भूमीत ध्वजारोहण करण्यात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ट्रस्टमध्ये सद्यकाळात 9 सदस्य आहे, परंतु आगामी काळात ही संख्या 15 होणार असल्याचे हुसैन यांनी सांगितले आहे. ट्रस्टमध्ये अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित पक्षकारांनाही आगामी काळात स्थान मिळू शकते. 5 एकर भूमीत धन्नीपुरमध्ये इंडो इस्लामिक कल्चरल फौंडेशन 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयही उभारणार आहे. तसेच तेथे सांस्कृतिक केंद्र आणि विशाल संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे.

Related Stories

भारत महात्मा गांधींचा देश; भाजपचा नाही

datta jadhav

भारत – नेपाळ सीमेवार गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

pradnya p

मुलांचा मृत्यू किरकोळ घटना नव्हे!

Patil_p

2 कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य ठरले ‘उत्तर प्रदेश’

pradnya p

चिंता वाढली : दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 864 वर

pradnya p

शिमला : ज्यूरी कॉलनीतील आयटीबीपीतील 18 जवान कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p
error: Content is protected !!