तरुण भारत

बेपत्ता तरुणाचा तिलारीत मृतदेह

प्रतिनिधी / साटेली भेडशी:

झरेबांबर येथील अनिल गणपत गवस (45) 22 जानेवारीपासून बेपत्ता होते. रविवारी दुपारी शोधादरम्यान त्यांचा मृतदेह तिलारी डावा कालवा साटेली-भेडशी भोमवाडी येथे आढळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल गवस शुक्रवारी सायंकाळपर्यंत आपल्या घरी परतले नाहीत. उशिरापर्यंत येणार म्हणून त्यांची वाट पाहिली. मात्र, ते न आल्यामुळे पत्नी अनुराधा गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. रविवारी त्यांच्या शोधादरम्यान साटेली-भेडशी भोमवाडी येथील डाव्या कालव्यात त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर या घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेऊन उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार भरत जाधव करत आहेत.

Related Stories

कोरोना प्रयोग शाळेला तब्बल 3 महिन्यांचा विलंब

Patil_p

पर्ससीन मासेमारी बंदचे आदेश

NIKHIL_N

राज्यातील समाजकंटक व सायबर गुन्हेगारांवर ३६३ गुन्हे दाखल

triratna

जि.प.कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

NIKHIL_N

कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 43

NIKHIL_N

रत्नागिरीतील मेर्वी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

triratna
error: Content is protected !!