तरुण भारत

सुळकूड येथे हिसडा मारून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

कागल / प्रतिनिधी

सुळकूड ता . कागल येथे माहिलेचे मंगळसूत्र हिसडा मारून तोडून नेल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी संबंधित माहिलेने कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोघा संशयीतांना चौकशी करीता ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गजबरवाडी येथील शितल विनोद जगताप यांची सुळकूड येथे शेती आहे. सकाळी पावणे दहा वाजता शितल या गजबरवाडीतून चालत शेताकडे चालल्या होत्या. सुळकूडच्या मुख्य रस्त्यावरून जात असताना त्यांच्या पाठीमागून स्प्लेंडर मोटरसायकलीवरून दोघेजण आले. त्यांच्या समोर काही अंतरावर त्यांनी मोटर सायकल थांबविली.

यातील एकजण शितल यांच्या जवळ आला. त्याने शितल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले आणि दोघेजण सुळकूडच्या दिशेने पळून गेले. शितल जगताप यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र पळवून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे .दरम्यान पोलिसांनी कसबा सांगाव येथे दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक प्रितमकुमार पुजारी हे करत आहेत.

Related Stories

स्वयंसेवी संस्थांनी ऑनलाईन नूतनीकरण करा

triratna

शाहूवाडी तालुका कंटेन्मेंट झोन जाहीर

triratna

कृष्णा पाईप लाईन गळतीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित द्या

triratna

बोरपाडळे येथील चोरी पाच दिवसात उघड

triratna

नागरिकांच्या समस्या सोडवणे हेच आपले यश : राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे

triratna

शाहूवाडीत सापडला अजून एक कोरोना रुग्ण

triratna
error: Content is protected !!