तरुण भारत

वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळकेला रौप्य

इतर वजनगटातील मल्लांनी केली निराशा

प्रतिनिधी / औंध

नोएडा उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या 65 व्या पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळके वगळता इतर मल्लांनी निराशा केली. वेताळने 86 किलो वनगटात रौप्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.

काल दोन पदके मिळाल्यानंतर आज तब्बल पाच मल्ल आखाड्यात दोन हात करणार होते. सिकंदर शेख, वेताळ शेळके, अक्षय हिरगुडे, समीर शेख, कालीचरण सोलनकर यांच्यावर महाराष्ट्राची मदार होती. खास करून मैदानी कुस्तीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सिकंदर शेखला गतवर्षीच्या सुवर्णपदकाची कामगिरीची पुनरावृती करण्याचे आव्हान पेलवले नाही.

एकिकडे इतर गटात ओळीने पराभव होत असताना वेताळ शेळके पाय रोवून उभा होता. अंतिम फेरीत दिल्लीच्या प्रवीण चहरने त्याला नमवले त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. वेताळ पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जूनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

Related Stories

वाई शहरात व्यापारी महासंघाकडून सॅनिटायझर फवारणी

Patil_p

मुंबईत नियम कडक : ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’

pradnya p

सज्जनगड भाविकांसाठी खुला

datta jadhav

सांगली कारागृहात ६२ कैद्यांना कोरोनाची लागण

triratna

सांगली : आँगस्ट क्रांतीदिनी बलवडीच्या क्रांतिस्मृतीवनात बालकांकडून अभिवादन

triratna

56 घरफोडय़ातील फरार सराईत चोरटा जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!