तरुण भारत

मद्यपी टँकर चालक अन् साताऱयात हलकल्लोळ

मद्यपी टँकरचालकाचा सुदैवाने न घडलेला थरार  समर्थ मंदिर येथील घटना

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

समर्थ मंदिर येथे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुधाचा टँकर चालक दारुच्या नशेत टँकर चालवत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच त्याला नागरिकांनी खाली उतरवले. उतरवल्यावर दारुच्या नशेत चूर असलेले हे महाशयांनी निवांत रस्त्यावरच स्वतःला झोकून दिले. मात्र, तोपर्यंत काही उत्साहींनी त्याचा व्हिडिओ काढून टँकरने 10 ते 12 उडवल्याच्या बढायाही मारल्या. त्या सोशल झाल्यामुळे साताऱयात हलकल्लोळ माजला होता. मात्र, सुदैवाने टँकर चालक मदहोश होता पण त्याच्या हातून अपघात घडला नव्हता.

त्याचे झाले असे, सातारकर रविवारी दुपारी वामकुक्षी घेत असताना समर्थ मंदिर परिसरात दुधाचा टँकर चालक हा दारु पिवून टँकर चालवत असल्याचे काहींच्या लक्षात आले. मग त्यांनी त्याला अडवून खाली उतरवले. खाली उतरवल्यावर तर चालक महाशयांनी चक्क रस्त्याकडेलाच झोकून दिले. ही माहिती त्या परिसरातील नागरिकांना मिळताच नागरिक जमा होवू लागले. काही अतिउत्साही तरुणही तेथे जमले. काहीजण पोवई नाक्यापासून दहा गाडय़ा उडवत आल्याचे सांगू लागले. तसे फक्त बोलण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.

तोपर्यंत शाहुपूरी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे अतिउत्साही तरुणांनी तेथे गोंधळ घालत होते. तर टँकर चालक बाजूला रस्त्याकडेला बाजूला पडला होता. त्यावेळी टँकर चालकाचे व्हिडीओ शुटींग अतिउत्साही तरुण काढत असताना होमगार्डने रोखले तर त्या होमगार्डलाच त्या तरुणांने मी कोण आहे ओळखलं का? अशी दमबाजी करायला सुरुवात केली.

पोलिसांनी अतिउत्साहांनी थोडासा खाक्या दाखवल्यावर सगळे शांत झाले. पोलिसांनी माहिती घेतल्यावर तशा प्रकारचे कोणतेही अपघात केले नसल्याची माहिती समोर आली. फक्त टँकर चालक मद्यधुंद होता. परिसरातील गर्दी हटवल्यावर वाहतूक सुरळीत करुन पोलीस निघून गेले. तोपर्यंत संबंधित टँकर मालकांना ही बातमी कळल्यावर ते हजर झाले. त्यांनी परिस्थिती पाहून तिथे मिटवामिटवी करुन चालकाला घेवून ते निघून गेले.

मात्र, तोपर्यंत काहीही घडले नसताना सोशल मीडियावर जे व्हायरल झाले त्याची सत्यता, असत्यता न पडताळता अतिउत्साहींनी जे काही केले. त्यामुळे काही काळ साताऱयात हलकल्लोळ झाला होता. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता. सुदैवाने काहीही घडलेले नाही. संबंधित आले व ते चालकासह निघून गेले आहेत. याबाबत काहीही तक्रार दाखल झालेली नसल्याचे सांगितले.

Related Stories

किल्ले अजिंक्यताऱयावर तटबंदीच्या कडेने झाडे लावण्यावरुन शिवभक्तांमधून संताप

Patil_p

… नाही तर पुण्यात फिरणे मुश्किल करू; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा

Rohan_P

सातारारोडमध्ये वृध्देला दोन लाखाचा गंडा

Patil_p

माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 103 उमेदवारी अर्ज

datta jadhav

मुंजवडीत तीन हातभट्ट्यांवर कारवाई

datta jadhav

सातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!