तरुण भारत

अजितदादा-शिवेंद्रराजेंच्यात गुप्तगू

एका महिन्यात तब्बल तिसऱयांदा भेट

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारचे आमदार शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये आहेत. तरीही त्यांनी एका महिन्यात तब्बल तीन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. तिसरी भेट रविवारी थेट बारामतीमध्ये जावून त्यांनी घेतली. त्यामुळे येवू घातलेल्या  जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तर चर्चा झाली नाही ना, अशीच राजकीय धुरिणांमध्ये तर्कवितर्क सुरु झाले आहेत. दरम्यान, शिवेंद्रराजेंनी या भेटीबाबत प्रसिद्धी माध्यमांनी छेडले असता राजकीय भेट नव्हती. मतदार संघातील कामानिमित्त भेट असल्याचे शिवेंद्रराजेंनी सांगितले.

भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे घट्ट मैत्री आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेल्यानंतरही त्यांची मैत्री तशीच आहे. शिवेंद्रराजे यांच्यात महिनाभरात झालेली ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ही भेट पार पडली. अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेच एका कक्षात बसले होते. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघातील कामानिमित्त अजितदादांना भेटायला आलो होतो. बाकी काहीही विषय नाही, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. साताऱयातील शरद पवार यांच्या पावसातील ऐतिहासिक सभेनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळवले होते. शिवेंद्रराजे यांची सलगी पुर्वीसारखीच अजितदादांशी बनू लागली आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत जाणार की काय अशा चर्चा सुरु आहेत.

तर येवू घातलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे जिल्हा बँकेचे गणित फिरणार आहे. भाजपा पॅनेल टाकण्याच्या तयारीत आहे. आजपर्यंत जिल्हा बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. त्या अनुषंगाने राजकीय पुढाऱयांची चाचचपणी सुरु आहे. परंतु त्याबाबतही आमदार शिवेंद्रराजे यांना छेडले असता त्यांनी राजकीय भेट नसल्याचे सांगितले.

शिवेंद्रराजेंसोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड

आमदार शिवेंद्रराजे यांचा लुक, त्यांच्या स्टाईलवर अनेकजण फॅन आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमधीलही अनेकजणांना शिवेंद्रराजे आल्याचे माहिती पडताच त्यांच्यासोबत एक सेल्फी म्हणत झंबडच पडली होती.

Related Stories

इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना रद्द, दूधगंगेतून पाणी

Abhijeet Shinde

अडीच वर्षे झाली की शिवसेना भाजपसोबत येईल; आठवलेंचे भाकित

Abhijeet Shinde

संभाव्य महापुरासाठी कुरूंदवाड पालिका प्रशासन सज्ज

Abhijeet Shinde

फलटणमध्ये गुटखाविरोधी कारवाईत अकरा जणांवर गुन्हा

datta jadhav

सातारा : आखाडे सुरू करण्यासाठी मल्लविद्या महासंघाची जिल्हाधिकारी यांचेकडे धाव !

Abhijeet Shinde

सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावरील रत्नशाळेची मावळ्यांकडून स्वच्छता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!