तरुण भारत

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना करावी लागणार चार महिन्यांची प्रतिक्षा

सोलापूर / प्रतिनिधी
कोवीड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात 11 केंद्रामध्ये लसीकरणास प्रारंभ होऊन आठवडा पूर्ण झाला. या आठवड्यात एकूण चार दिवसात 3 हजार 521 जणांना लस देण्यात आले. टप्प्याटप्याने देण्यात येत असलेल्या लसीकरण प्रक्रियेनुसार उत्सूक नागरिकांपर्यंत लस पोहचण्यास आणखी चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.  

सोलापूर शहर व जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 11 केंद्रावर नियोजनबध्द पध्दतीने लसीकरणास प्रारंभ झाले. पहिल्याच दिवशी डॉ. वैशंपायन महाविद्यालय, बार्शी, सांगोला, करमाळा ही चार केंद्रे वगळता उर्वरित सात केंद्रावर 100 टक्के लसीकरण झाले. पहिल्या दिवशी 994 आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आले. त्यानंतर एक दिवसाआड असे तीन दिवस लसीकरण करण्यात आले. आठवड्याभरात चार दिवसात नोंदी असलेल्या 4 हजार 400 आरेाग्य कर्मचार्‍यांपैकी 3 हजार 521 जणांना लस देण्यात आली. आठवड्यात 4 हजार याप्रमाणे पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या 34 हजार 184 कोवीडशिल्ड डोस पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यातच येत्या रविवारी पोलीओ लसीकरण आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा या कामासाठी कार्यान्वित असणार आहे. त्यामुळे पुन्हा लसीकरण प्रक्रिया लांबणीवर पडेल. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात पोलीसांसह इतर शासकीय कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा समावेश चौथ्या टप्प्यात असल्याने उत्साही नागरिकांपर्यंत शासनाची लस पोहचण्यास आणखी चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

नियोजनानुसार लसीकरण सुरू आहे

 • जिल्ह्याकरिता मिळालेले कोवीडशील्ड एक दिवसाआड देण्यात येत आहे. दिवसाला ११०० कर्मचारी याप्रमाणे लसीकरण होत आहे. शासनाच्या सुचनेनुसार टप्पा ठरविण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांचा चौथ्या टप्प्यात लस प्राप्त होईल. नियोजनाप्रमाणे लसीकरण सुरु आहे. लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्य आरोग्यावर कोणतेही विपरित परिणाम दिसून आले नाहीत.
 • डॉ. शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर

आठवड्याभरात केंद्रनिहाय झालेली लसीकरण (400 पैकी)

 1. दाराशा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र – 337
 2. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – 237
 3. सिव्हिल हॉस्पिटल – 400
 4. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय – 356
 5. बार्शी ग्रामीण रुग्णालय – 321
 6. करमाळा उपजिल्हा रुग्णालय – 279
 7. अकलूज उपजिल्हा रुग्णालय – 357
 8. मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय – 278
 9. पंढरपूर ग्रामीण रुग्णालय – 288
 10. सांगोला ग्रामीण रुग्णालय – 311
 11. कुंभारी अश्‍विनी ग्रामीण रुग्णालय – 357

Related Stories

कोरोना बाधित 3 रुग्ण बरे होऊण पोहचले घरी -वैदकीय अधिकारी डॉ. औदुंबर मस्के

triratna

विक्रम भावेच्या जामिनावर 21 जानेवारीला निकाल

prashant_c

घरकुलाचा पाचवा हप्ता काढण्यासाठी लाचेची मागणी; सुहास शिंदे जाळ्यात

Shankar_P

तज्ञ डॉक्टरांची समिती सोलापुरात दाखल

triratna

सीमाप्रश्नी कर्नाटकातील आणि केंद्रातील भाजप सरकार आपले ऐकणार का ? – आ. रोहीत पवार

Shankar_P

सोलापुरात कोरोनाचे नवे 11 रुग्ण, तिघांचा बळी

triratna
error: Content is protected !!