तरुण भारत

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संमेलनाला प्रारंभ

28 जानेवारी रोजी मोदींचे संबोधन ः बायडेन, जॉन्सन होणार नाहीत सामील

वृत्तसंस्था/ दावोस

Advertisements

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (डब्ल्यूईएफ) ऑनलाईन परिषद 24 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी सुरू झाली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यासारखे जगातील मोठे नेते सामील होतील. परंतु या परिषदेत अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सामील होणार नाहीत. 6 दिवसांपर्यंत चालणारी दावोसमधील परिषद ऑनलाईन असणार असून 29 रोजी त्याचा समारोप होणार आहे.

फोरमनुसार ऑनलाईन परिषदेत पंतप्रधान मोदींचे संबोधन 28 जानेवारी रोजी होणार आहे. तर जिनपिंग यांचे भाषण सोमवारी होणार आहे. भारताच्या वतीने पींय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, वाहतूक मंत्री नितिन गडकरी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, वस्त्राsद्योग मंत्री स्मृती इराणी सामील होतील.

याचबरोबर परिषदेत देशातील दिग्गज उद्योजक सहभागी होणार आहेत. यात मुकेश अंबानी, गौतम अदानी, पवन मुंजाल, आनंद महिंद्रा, सलील पारेख, शोभना कामिनेनी समवेत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. नरेंद्रन यांचा समावेश असेल.

राष्ट्राध्यक्षांचा सहभाग

परिषदेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, युरोपीय महासंघ अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा समवेत जगातील अन्य राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. याचबरोबर जगातील प्रमुख उद्योगपती मॅन क्रिस्टिन लेगार्ड, बिल गेट्स, अजय बंगा, के. टी. रामाराव, इशान थरूर, सॉफ्ट बँकेचे मासायोशी समवेत अन्य लोक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.

महामारी आणि लसीकरण

परिषदेचा मुख्य भर कोविड-19 महामारीवर राहणार असून जगातील सर्व देशांपर्यंत लसीकरण पोहोचविण्याचा प्रयत्न दिसून येणार आहे. तसेच हवामान बदल आणि अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा घडविण्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.  परिषदेच्या प्रारंभी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस एम. श्वाब भाषण करणार आहेत. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची यंदा मे महिन्यात होणारी वार्षिक बैठक सिंगापूरमध्ये आयोजित केली जाणार आहे. 

Related Stories

ममतांच्या शासनकाळात भ्रष्टाचार फोफावला

Patil_p

केरळ मतदार यादीप्रकरणी होणार चौकशी

Patil_p

मध्यान्ह आहारात मिळणार फोर्टिफाइड राइस

Patil_p

देशात गेल्या 24 तासात 1409 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

दिल्लीत 6,842 नवे कोरोना रुग्ण; 51 मृत्यू

Rohan_P

मध्य प्रदेशमध्ये तिरंगा उभारताना घडली दुर्घटना, तीघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!