तरुण भारत

डिजिटल मतदार ओळखपत्र आजपासून मिळणार

मतदारदिनी सुविधेचा शुभारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशात 25 जानेवारी रोजी मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनी निवडणूक आयोगही मतदारांना मोठी भेट देण्यास तयार आहे. 25 जानेवारी रोजी देशात डिजिटल मतदार ओळखपत्र सादर करण्यात येणार आहे. हे ओळखपत्र आधारप्रमाणेच मतदारांना डाऊनलोड करता येणार आहे.  निवडणूक आयोगाकडून सोमवारी इलेक्ट्रॉनिक इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी ऍप (ई-इपिक) सादर करण्यात येणार आहे.

ई-इपिकच्या वापरासाठी विशेष प्रकिया आणि काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. डिजिटल मतदार ओळखपत्रासाठी मतदाराला स्वतःच्या पूर्ण माहितीचे प्रमाणन करावे लागणार आहे. मतदाराच्या मोबाईल क्रमांकासह त्याचा ई-मेल आयडीही लागणार आहे.

प्रक्रियेच्या अंतर्गत मतदाराचा मोबाईल क्रमांक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नोंद होताच ऍपद्वारे त्याला मेल आणि एक संदेश फोनवर प्राप्त होईल. यात सुरक्षेची काळजी घेत पासवर्डच्या स्वरुपात ओटीपीची सुविधा राहणार आहे. यात दोन क्यूआर कोडही असतील. यात मतदारांची पूर्ण माहिती आणि भागाची पूर्ण माहिती असणार आहे.

निवडणूक आयोग मतदार ओळखपत्राच्या प्रत्यक्ष प्रतीचा पर्यायही कायम ठेवणार  असून याकरिता 25 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. डिजिटल व्यवस्थेमुळे ओळखपत्र गहाळ होणे आणि नवे ओळखपत्र प्राप्त करण्याच्या दीर्घ प्रक्रियेपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच आयोगाला ओळखपत्र पोहोचविण्याच्या प्रक्रियेपासून दिलासा मिळणार आहे.

Related Stories

ऍमस्टरडॅमध्ये 3डी प्रिंटेड स्टील ब्रिज

Patil_p

हिमाचलप्रदेशात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

Rohan_P

यूपीमध्ये ‘थ्री टी’ फॉर्म्युला हिट! मागील 24 तासात 1497 नवीन कोरोना रुग्ण

Rohan_P

‘जिओ’चा 10 वा मोठा करार; दोन कंपन्यांनी केली 6441.3 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

चीनवर चहुबाजूने होणार वार, क्वाडचा युद्धाभ्यास

Patil_p

सलग तिसऱया दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

Amit Kulkarni
error: Content is protected !!