तरुण भारत

वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसमध्ये आढळले कासव

प्रतिनिधी / लांजा

वेंगुर्ले- रत्नागिरी एसटी बसमध्ये चालक व वाहकाला कासव फिरताना आढल्याने कासवाला एसटी कर्मचाऱ्यानी लांजा येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. मात्र कासव चक्क एसटी बसमध्ये आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisements

वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसच्या कर्मचाऱ्यांना बस मध्ये सापडलेले कासव हे गोड्या पाण्यातील असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र एस.टी बसमध्ये कासव आढळल्याने तस्करीबाबतचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे.

वेंगुर्ले ते रत्नागिरी असा एस.टी फेरी सुरू असताना बस वाहक यांना बसमध्ये काळ्या पाठीचे एक कासव फिरताना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती चालकाला दिली. कासवाला ताब्यात घेऊन एस.टी बस रविवारी सकाळी ११ वाजता लांजा बस स्थानकात आली असता लांजाचे वाहतूक नियंत्रक यांना माहिती दिली. कासव सापडल्याची माहिती एस.टीच्या कर्मचारी यांनी लांजा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलाने वनविभागाचे कर्मचारी लांजा बस स्थानकात दाखल झाले. कासवाला ताब्यात घेऊन त्यांनी कासवाला वन अधिवासात सोडून दिले.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी रेल्वे ट्रॅक मार्गावर सुल्काटा जातीचे सोनेरी रंगाचे कासव सापडले होते. रविवारी एस.टी बसमध्ये काळ्या रंगाचे व गोड्या पाण्यातील कासव सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. कासवाची तस्करी केली जात नाही ना ? असा सवाल प्राणीमित्रांना पडला आहे.

Related Stories

‘डीबीएल,’ ‘आरटी फॅक्ट’ हायवे कंपनीवर कारवाई!

NIKHIL_N

जि. प. ची ‘स्टडी फ्रॉम होम’ सुविधा

NIKHIL_N

क्वारंटाईनची व्यवस्था पडतेय अपुरी

NIKHIL_N

मालवण येथे २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु

Ganeshprasad Gogate

दापोली बसस्थानकातील दुकानाला आग

triratna

कोरोनामुळे राजापूर नगर परिषदेच्या 15 कोटींच्या कामांना खीळ

Patil_p
error: Content is protected !!