तरुण भारत

स्पेसएक्सकडून विक्रमी 143 उपग्रह प्रक्षेपित

एकाच प्रक्षेपकाद्वारे मोहीम ः छोटय़ा कंपन्यांसाठी अंतराळाचा मार्ग खुला

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

जगातील सर्वात धनाढय़ उद्योजक एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने रविवारी एकाच प्रक्षेपाकडून 143 छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम नोंदविला आहे. खर्चकपातीच्या उद्देशाने प्रक्षेपित करण्यात आलेली ही मोहीम कॅबमध्ये राइड शेअर करण्यासारखीच आहे. या मोहिमेला ट्रान्सपोर्टर-1 नाव देण्यात आले. फ्लोरिडाच्या केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून टू स्टेज फाल्कन-9 प्रक्षेपकाद्वारे उपग्रह अंतराळात पाठविण्यात आले आहेत.

फाल्कन-9 प्रक्षेपकाने 143 उपग्रहांसह कक्षेत प्रवेश केला आहे. एका मोहिमेत पाठविण्यात आलेल्या उपग्रहांची ही सर्वात मोठी संख्या आहे. याचबरोबर स्पेसएक्सची पहिली स्मॉलसॅट राइडशेअर प्रोग्राम मोहीम पूर्ण होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीनुसार राइडशेअर प्रोग्राम छोटय़ा उपग्रह कंपन्यांना कमी किमतीत अंतराळापर्यंत पोहोचविले जाते. 200 किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहासाठी 1 दशलक्ष डॉलर्सपासून (सुमारे 73 लाख रुपये) याची सुरुवात होते. याच्या माध्यमातून कंपन्या स्वतःच्या उपग्रहाला अंतराळात पाठवू शकतात.

रविवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 143 उपग्रहांमध्ये अमेरिका आणि जर्मनीचे 43 अर्थइमेजिंग उपग्रह, 17 संपर्कविषयक उपग्रह आणि 30 छोटे उपग्रह सामील आहेत. फाल्कन-9 प्रक्षेपकाने चप्पलांच्या बॉक्सच्या आकाराचा क्यूबसेट्स आणि मायक्रो उपग्रहही कक्षेत पाठविला आहे.

पेलोड/उपग्रहांची संख्या अमेरिकेतील तसेच जागतिक विक्रम मोडीत काढण्याच्या हिशेबाने अत्यंत अधिक आहे. मागील विक्रम 108 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये साइग्नस मोहिमेत हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते. स्पेसएक्सचा मागील विक्रम 64 उपग्रहांचा आहे. एसएसओ-ए नावाची ही मोहीम डिसेंबर 2018 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. फ्लोरिडा येथून पोलर कॉरिडॉग मार्गाचा वापर करणारी ट्रान्सपोर्टर-1 ही 1969 नंतरची दुसरी मोहीम होती.

इस्रोकडून 104 उपग्रह प्रक्षेपित

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने श्रीहरिकोटा येथून 2017 मध्ये एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले होते. यातील बहुतांश उपग्रह अमेरिकेचे होते. त्यापूर्वी हा विक्रम रशियाच्या नावावर आहे. इस्रोने ही मोहीम पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे पूर्ण केली होती.

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.50 लाखांवर

datta jadhav

चीनला मोठा झटका, रशियाने रोखला व्यवहार

Patil_p

नेपाळमध्ये राजकीय संकट, चीन सैरभैर

Patil_p

पाकिस्तान : कराचीजवळ प्रवासी विमान कोसळले

datta jadhav

भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत

Patil_p

चिनी ऍप्सवर अमेरिकेतही बंदी?

Patil_p
error: Content is protected !!