अन्य पाहुण्यांकडूनही राम मंदिरासाठी देणगी
गुजरातच्या सूरत येथील एका हिरेव्यापाऱयाच्या मुलीला तिच्या विवाहात कन्यादानाच्या स्वरुपात दीड लाख रुपये प्राप्त झाले. या मुलीने ही रक्कम राम मंदिराच्या निर्मितीसाठी दिली आहे. हिरेव्यापारी रमेश भालानी यांची कन्या दृष्टी ज्वेलरी डिझाइनर असून रविवारी तिचा विवाह उद्योजक सिद्धार्थसोबत पार पडला आहे.
विवाहात दृष्टीच्या पित्याने कन्यादानात 1.50 लाख रुपये दिले. दृष्टीने ही पूर्ण रक्कम मंदिरासाठी दान केली आहे. दृष्टीकडून प्रेरणा घेत सोहळय़ात उपस्थित लोकांनीही राम मंदिर उभारणीत योगदान दिले आहे.
अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घेण्याची इच्छा
राम मंदिर उभारणीच्या निधीसंकलनात सूरत शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस देणगीसाठी लोक सरसावत आहेत. तर रविवारच्या दिवशी शहरात एकूण 23.50 लाख रुपयांची देणगी शहरात प्राप्त झाली आहे.
कित्येक वर्षांपासून आम्ही सर्वजण राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रतीक्षा करत होतो. आता भगवान रामाचे मंदिर उभारण्यात येणार आहे. अशा स्थितीत माझ्याकडून दिलेले योगदान आमच्या कुटुंबासाठी गर्वाचा क्षण आहे. अयोध्येत जात भगवान रामाचे दर्शन घेतल्यावर मला माझ्या विवाहाचे स्मरण होईल असे दृष्टीने म्हटले आहे.