तरुण भारत

नताशा-वरुण धवन विवाहाच्या बेडीत

जीवनभराचे प्रेम ‘ऑफिशियल’ झाले

अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझाइनर नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अलिबाग येथे पार पडला आहे. विवाहाचे विधी आटोपल्यावर वरुणने स्वतः समाजमाध्यमांवर  याची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. माझ्या जीवनभराचे प्रेम आता ऑफिशियल (अधिकृत) झाल्याचे वरुणने समाजमाध्यमांवर म्हटले आहे. मेन्शन हाउसमध्ये कॅमेरा आणि प्रसारमाध्यमांवरील कठोर बंदीदरम्यान दोघेही विवाहबद्ध झाले आहेत.

सात जन्माच्या सात फेऱया घेण्यापूर्वी दुपारी 1 वाजता हळदीचा विधी पार पडला आहे. ज्यानंतर टीम वीर आणि टीम हम्प्टीची संगीत आणि डान्स पार्टी झाली आहे. सुमारे 7 वाजता मेन्शन हाउसच्या आत वरातीचे संगीत ऐकू आले. वरुण क्वाड बाइकवरून वरातीत सामील झाला होता. विवाहाचे वृत्तांकन करण्यासाठी अलीबाग येथे पोहोचलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी वरुणकडून खाद्यपाकिटे पाठविण्यात आली होती. 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत जेडब्ल्यू मॅरिएटमध्ये स्वागत समारंभ होणार आहे.

वेडिंग ट्रूजोचे डिझाइन

नताशा फॅशन डिझाइनर असून तिच्या कंपनीकडून वेडिंग गाउन आणि ब्रायडल ड्रेसेज तयार केले जातात. अशा स्थितीत नताशाने स्वतःच्या विवाहासाटी स्वतःच डिझाइन केलेले ड्रेस निवडले होते.

नो-फोटो धोरण

दीपिका पदूकोन-रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा-निक जोन्सच्या विवाहसोहळय़ात नो फोटो धोरण अवलंबिण्यात आले होते. याचप्रकारे वरुण-नताशाच्या विवाहातही याचे अनुकरण करण्यात आले आहे. अतिथी, इव्हेंट कंपनीचे कर्मचारी आणि अलिबाग मेंन्शनच्या कर्मचाऱयांच्या मोबाईल्सवर स्टिकर लावण्यात आले होते.

उपस्थित अतिथी

कोरोना महामारीमुळे वरुणच्या विवाहसोहळय़ात अत्यंत कमी लोकांची उपस्थिती राहिली आहे. सोहळय़ात उपस्थित राहणाऱयांमध्ये मनीष मल्होत्रा, शशांक खेतान, कुणाल कोहली, जोया मोरानी आणि करण जौहरची छायाचित्रे समोर आली होती.

मधुचंद्रासाठी तुर्कस्तानला पसंती

वरुण धवन आणि नताशा हे नवदांपत्य मधुचंद्रासाठी तुर्कस्तानला रवाना होणार आहे. वरुणने आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणातून 10 दिवसांचा बेक घेतला आहे. याचदरम्यान तुर्कस्तानातून परतताच वरुण चित्रिकरणासाठी अरुणाचल प्रदेशला रवाना होणार आहे.

Related Stories

कलाकार करत आहेत स्वत:चाच मेकअप

Patil_p

म्होरक्यामध्ये आनंद शिंदेंचे रॅप

Patil_p

…जस्टिस नहीं जजमेंट होता है

Amit Kulkarni

कलाकारांनी मानले कोविड योद्धय़ांचे आभार

Patil_p

‘गंगूबाई काठियावाडी’चे डिजिटल हक्क 70 कोटींमध्ये

Amit Kulkarni

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण

Patil_p
error: Content is protected !!