तरुण भारत

मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाडय़ा सुरू होणार

सध्या 1100 विशेष रेल्वे धावताहेत

देशात कोरोनाचा फैलाव कमी होत असूनही मोठय़ा संख्येत अद्याप रेल्वेफेऱया बंद आहेत. बहुतांशी प्रमुख मार्गांवरच विशेष रेल्वे धावत असून लोकांना यात दुप्पटीपर्यंत प्रवासभाडे द्यावे लागत आहे. अशा स्थितीत मार्चपर्यंत सर्व मेल-एक्स्प्रेस रेल्वे सुरू होतील अशी अपेक्षा रेल्वे मंत्रालयाला आहे. नियमित रेल्वेंना पुन्हा रुळावर आणण्याची तयारी आहे.

Advertisements

देशात कोरोना संक्रमणापूर्वी सुमारे 12 हजार प्रवासी रेल्वे धावत होत्या. रेल्वे मंत्रालयानुसार सध्या 1700 मेल-एक्स्प्रेस रेल्वेंपैकी 1100 पेक्षा अधिक रेल्वेगाडय़ा धावत आहेत. 5 ते 6 हजार उपनगरीय रेल्वेंपैकी 90 टक्के धावत आहेत. आंतरशहरीय रेल्वेफेऱया सुमारे 3.5 हजार असून यातील सुमारे 300 च सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि गृहमंत्रालय कोविडच्या स्थितीचा आढावा घेत रेल्वे मंत्रालयाला अहवाल देणार आहे. राज्यांमध्ये परस्पर सहमती, त्यांच्या मागणीच्या आधारावर अधिक आंतरराज्य रेल्वे चालविण्यासंबंधी निर्णय होईल. महाराष्ट्र आणि केरळ वगळता अन्य सर्व राज्यांमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने रेल्वेंची संख्या पुढील महिन्यापासून वाढणार असल्याचे मानले जात आहे.

Related Stories

“कुंभमेळ्याची चूक कमी म्हणून की काय आता चार धाम यात्रा”

Abhijeet Shinde

छत्तीसगड : महिलेची आपल्या 5 मुलींसह रेल्वेखाली आत्महत्या; कारण…

Rohan_P

विशाखापट्टणममधील स्क्रॅपयार्डला भीषण आग

datta jadhav

राम मंदिराची उभारणी अनुभवता येणार

Patil_p

दरवर्षी 16 जानेवारी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’

Patil_p

झारखंडमध्ये 5 उग्रवादी अटकेत

Patil_p
error: Content is protected !!