तरुण भारत

प्रतीक्षा संपली- ‘आरआरआर’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’ यंदाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक अत्यंत आतुरतेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता याच्या प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर झाला आहे. दिग्दर्शक राजामौली यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून याची माहिती अभिनेत्री आलिया भट्टने समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. आरआरआर दसऱयाच्या दिनी प्रदर्शित होत आहे.

“आरआरआरसाठी तयार रहा. 13 ऑक्टोबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये येत आहे’’ असे आलियाने ट्विटरवर नमूद केले आहे.  चित्रपटात राम चरण आणि एनटीआर ज्युनियर मुख्य भूमिकेत आहेत. तर अजय देवगण आणि आलिया भट्ट विशेष भूमिकांमध्ये दिसतील.  2017 मधील बाहुबली 2 नंतर राजामौली 4 वर्षांनी नवा चित्रपट घेऊन येत आहेत. बाहुबली हा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.

आरआरआर हा स्वातंत्र्यलढय़ावर बेतलेला चित्रपट आहे. आरआरआरचे पूर्ण नाव रौद्रम रणम रुधिरम आहे. मुख्त्वे तेलगूत निर्माण होत असलेला आरआआर हिंदीसमवेत अन्य भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Related Stories

सगळं कसं खरंखुरं!

tarunbharat

रोल… कॅमेरा…ऍक्शनसाठी चंद्रमुखी सज्ज

Patil_p

राज ठाकरे यांच्या हस्ते 8 दोन 75

Patil_p

स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवरून पवारांना गोवण्याचा प्रयत्न दुर्दैवी – डॉ. अमोल कोल्हे

triratna

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा

pradnya p

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला 300 भागांचा टप्पा

Patil_p
error: Content is protected !!