तरुण भारत

दापोलीतील समुद्रकिनारे पुन्हा गजबजले!

वार्ताहर/ मौजेदापोली

 दापोली तालुक्यातील गेले काही दिवस थंडावलेले समुद्रकिनारे पुन्हा एकदा पर्यटकांच्या येण्याने गजबजले असल्याचे चित्र सध्या मुरूड, कर्दे, आंजर्ले, लाडघर, हर्णै किनाऱयांवर पहायला मिळत आहे.

  मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली तालुक्यात कोरोनाच्या अधिक प्रादुर्भावानंतर पर्यटकांनी चांगली हजेरी लावली होती, परंतु त्यानंतर पुन्हा ही गर्दी थंडावली होती. मात्र पुन्हा एकदा शनिवारी व रविवारी दापोलीतील पर्यटन स्थळांजवळील समुद्रकिनारे चांगलेच हाऊसफुल्ल झाले आहेत. ही गर्दी आता प्रजासत्ताक दिनापर्यंत कायम राहण्याची शक्यता दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. दापोलीत शुक्रवारी सायंकाळी पर्यटकांनी हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून थंडीनेदेखील हजेरी लावल्यामुळे अनेक पर्यटक मिनीमहाबळेश्वरचा आनंद लुटत आहेत. पुन्हा पर्यटकाची गर्दी वाढल्यामुळे हॉटेल व्यावसायिकदेखील सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे.

  पर्यटकांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागांमध्ये रविवारी सायंकाळनंतर वाहतूक कोंडी झाली. मात्र स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडी, खराब रस्ते या साऱयांचा सामना करावा लागत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी तरी पुढे येऊन रस्ते व इतर मूलभूत सुविधांमध्ये सुलभता आणावी अशी मागणी नागरिक व पर्यटकांमधून होत आहे.

बीएनएनएलची सेवा म्हणजे वाऱयावरची वरात

  मुरूड गाव हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी याठिकाणी बीएसएनएलशिवाय दुसऱया कोणत्याच कंपनीची सेवा नाही. त्यामुळे येथील नागरिकांना व येणाऱया पर्यटकांना बीएसएनएलवरच अवलंबून रहावे लागते. बीएनसएनलची रेंज वारंवार जाणे, रेंज असली तरी नेट न चालणे अशा अनेक कारणांनी पर्यटक, नागरिक त्रस्त आहेत. स्थानिक प्रशासनदेखील याकडे गांभीर्याने पहात नाही. याचा फटका नागरिकांना बसत आहे. एकंदरीत दुसऱया कंपनीची साथ गावाला नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. वारंवार रेंज जात असल्याने व नेट चालत नसल्यामुळे बीएनसएनलची सेवा म्हणजे वाऱयावरची वरात असल्याचे अनेकजण बोलत आहेत.

Related Stories

जिह्यात कोरोना चाचण्यात घट , रूग्णसंख्येला आळा

Omkar B

अवकाळी पावसामुळे नगदी पिके धोक्यात

NIKHIL_N

व्यापारी महासंघाचा आंदोलनाचा इशारा

Patil_p

धक्कादायक – रत्नागिरी कारागृहातील एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह

triratna

चार राज्यातून येणाऱयांना टेस्ट बंधनकारक

NIKHIL_N

असुविधांमुळे पडवेत स्वॅब प्रयोगशाळा अशक्य!

NIKHIL_N
error: Content is protected !!