तरुण भारत

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तीसाठी तरतूद करण्यात येणार

प्रतिनिधी/ सातारा

 शहर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या दोन नागरिकांचा मृत्यू देखिल झाला आहे. या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी शासनाने विशेष तरतुद देखिल केली आहे. या अनुषंगाने पालिका प्रशासनातर्फे 30 लाखाच्या निधीची तरतूद असलेला विषय देखिल येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.

 या निधीनून सलग दोन वर्षे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी अंदाजे दोन हजार आणि दुसऱया वर्षी अंदाजे दोन हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. तब्बल सहा वर्षानंतर आता पुन्हा एकदा हा विषय हाताळण्यात येणार आहे.

 याचबरोबर उघडय़ावर खरकटे टाकणाऱया हॉटेल, चायनीज गाडीचालकांवर कठोर कारवायी देखिल प्रशासनातर्फे करावी. कारण भटकी कुत्री ही उघडय़ावर पडणारे मांसाहार खातात व त्यांना त्याची सवय लागते. ते न मिळल्यास ती हिंस्त्र बनतात व इतर मुक जनावरांचा कित्तेक वेळा नागरिकांवर हल्ला चढवीतात. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेणे तितकेच गरजेचे आहे.

 त्याचबरोबर या कुत्र्यांना घेऊन जाण्याकरीता डॉग व्हॅन असते, पण आपल्या जिल्हय़ात मात्र अद्याप ही व्हॅन कधीच सातारकरांच्या नजरीयेला आली नाही. त्यामुळे डॉग वॅनची व्यवस्था देखिल त्वरीत करावी, अशी मागनी देखिल सर्वसामान्य नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

 अखेरीस प्रशासनाला आली जाग

 एकंदरीतच काय की, प्रशासनाला अखेर जाग आली आहे. पण यासाठी दोन निष्पाप नागरिकांना मात्र आपला जीव गमवावा लागला. येत्या 3 फेब्रुवारी रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा आहे, यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त बाबत विषय मांडण्यात येणार आहे.

Related Stories

जखमी बिबटय़ाची महामार्ग ओलांडून धूम

Omkar B

सातारा : गंभीर रुग्णांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली

datta jadhav

सातारा : पालिकेच्या व्यापारी संकुलात आढळला बेवारस मृतदेह

datta jadhav

शिरवळ, भुईंजमध्ये घरफोडी

Patil_p

अंगणवाडी सेविकेचा भावाकडून खून

Patil_p

कोल्हापूर : शाहुवाडीत आणखीन पाच नवे कोरोना बाधित रुग्ण

triratna
error: Content is protected !!