तरुण भारत

फौजदार भरत नाळे यांचा राष्ट्रपती पदकाने होणार गौरव

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा पोलीस दलासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अभिमानाची गोष्ट घडली असून जिल्हा पोलीस दलात सेवा बजावत असलेले फौजदार भरत नाळे यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकाने गौरव होणार आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Advertisements

भरत नाळे हे सातारा पोलीस दलात 1998 साली भरती झाले. पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक फौजदार पदापर्यंत त्यांना पदोन्नती मिळाली. दरम्यान, फौजदार परीक्षा दिल्याने त्यांची त्यातही निवड झाली असून गेल्या अडीच महिन्यांपासून कोरेगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाचे ते वाचक (रीडर) म्हणून सेवा बजावत आहेत.

सातारा पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी विविध पोलीस ठाणी, विभागात काम केले आहे. आतापर्यंत 740 रिवॉर्ड त्यांना मिळालेली आहेत. 2015 साली त्यांना पोलीस महासंचालक पदकाने (डीजी मेडल) गौरवण्यात आले होते. गत महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल तसेच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत बर्डे यांनादेखील पोलीस महासंचालकांनी पदक देऊन गौरवले होते आणि आता भरत नाळे यांच्या रूपाने राष्ट्रपती पदकामुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.

Related Stories

सातारा : ‘त्या’ वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Abhijeet Shinde

फेरीवाल्यांना पालिका देणार 1 हजार रूपये

Patil_p

पुळकोटीत पुरात दोघे वाहून गेले

Patil_p

लॉटरीच्या आमिषाने महिलेला सतरा लाखांचा गंडा

Patil_p

तहसीलदारांनी बजावली दिड लाखाच्या दंडाची नोटीस

Patil_p

फोटोंचा गैरवापर करुन निर्मात्याची बदनामी

Patil_p
error: Content is protected !!