तरुण भारत

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी मालिका जूनमध्ये

वृत्तसंस्था/ लंडन

यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये खेळविली जाणार आहे. इंग्लंडचा संघ  मायदेशातील उन्हाळी मोसमाला या मालिकेने प्रारंभ करणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी लॉर्डस् मैदानावर 2 ते 6 जून दरम्यान होणार आहे. यानंतर उभय संघातील दुसरी कसोटी 10 ते 14 जून दरम्यान एजबॅस्टन येथे खेळविली जाणार आहे. या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा संघ श्रीलंका संघाबरोबर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 23 जूनपासून सुरू होईल. आगामी उन्हाळी क्रिकेट मोसमामध्ये इंग्लंडचा संघ पाक बरोबर वनडे आणि टी-20 मालिका तसेच त्यानंतर भारताबरोबर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे

Related Stories

सिंधूला सोपा ड्रॉ, सायनासाठी कठीण वहिवाट

Omkar B

विश्वचषक स्पर्धेत प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज’ ठरेल

Patil_p

व्हॉलीबॉल नेशन्स लिग स्पर्धा रद्द

Patil_p

रशियन मुष्टियुद्ध प्रशिक्षकाला कोरोना

Patil_p

ड्रीम 11 चा पुढील 2 वर्षांचा प्रस्ताव फेटाळला

Patil_p

झिंबाब्वेच्या पहिल्या डावात 406 धावा

Patil_p
error: Content is protected !!