तरुण भारत

चेल्सीचे मॅनेजर लॅम्पार्ड यांची हकालपट्टी

वृत्तसंस्था/ लंडन

चेल्सीने प्रँक लॅम्पार्ड यांची व्यवस्थापक पदावरून हकालपट्टी केली असल्याचे सोमवारी सांगितले. लीगमधील आठपैकी पाच सामने चेल्सीला गमवावे लागल्याने त्यांची नवव्या स्थानावर घसरण झाल्यामुळे क्लबने हा निर्णय घेतला आहे.

2019-20 या मोसमात लॅम्पार्ड यांनी संघाची सूत्रे स्वीकारली होती आणि पदार्पणाच्या मोहिमेतच त्यांनी चेल्सीला टॉप चारमध्ये स्थान मिळवून दिले तर एफए कपच्या अंतिम फेरीपर्यंत संघाला मजल मारून दिली होती. मात्र या मोसमात क्लबने नव्या भरतीसाठी 220 दशलक्ष पौंड्स खर्च करूनही लॅम्पार्ड यांना चेल्सीकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेता आली नाही. रविवारी चेल्सीने लुटॉनचा 3-1 असा पराभव करून एफए चषकाच्या पाचव्या फेरीत स्थान मिळविले. त्यानंतर चोवीस तासाच्या आतच लॅम्पार्ड यांना संघ सोडावा लागला आहे. लॅम्पार्ड हे क्लबचे माजी खेळाडू असून त्यांनी तीन प्रिमियर लीग आणि एकदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळविले आहे. याशिवाय क्लबचे ते सर्वाधिक गोल नोंदवणारे खेळाडू आहेत. 2003 मध्ये रशियाच्या रोमन अब्रामोविच यांनी क्लब खरेदी केल्यापासून हकालपट्टी करण्यात आलेले लॅम्पार्ड हे 12 वे मॅनेजर आहेत.

Related Stories

कतार ओपनमधून हॅलेपची माघार

Patil_p

अझारेन्का, पिरोन्कोव्हा, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

जोकोव्हिच, मेदव्हेदेव यांचे शानदार विजय

Patil_p

गॉफ, टिचमन उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

फेलिसियानो लोपेझ उपांत्यपूर्व फेरीत,

Patil_p

‘बायो-बबल’मुळे मानसिक संतुलन ढळण्याचा धोका

Patil_p
error: Content is protected !!