नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 13 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. गेल्या 24 तासात देशभरात 13 हजार 298 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले असल्यामुळे आता रिकव्हरी दर 96.83 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
आतापर्यंत 1 कोटी 6 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 13,203 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच देशात 131 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 1 लाख 84 हजार 182 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 53 हजार 470 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1 कोटी 6 लाख 67 हजार 736 इतका झाला आहे. त्यापैकी 1 लाख 53 हजार 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना संसर्ग अद्याप आटोक्मयात आलेला नाही. अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या सध्या दीडशेपर्यंत खाली आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 24 जानेवारीपर्यंत 19 कोटी 23 लाख 37 हजार 117 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 5 लाख 70 हजार 246 नमुने रविवारी एका दिवसात तपासण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली.