तरुण भारत

स्वर मल्हारतर्फे आज शास्त्रीय गायन मैफल

मैफलीत देवरुख येथील कुणाल भिडे-मुंबईचे महेश कुलकर्णी यांचे गायन होणार

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

स्वर मल्हारतर्फे दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बुधवारपेठ येथील अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत देवरुख येथील कुणाल भिडे व मुंबईचे महेश कुलकर्णी यांचे गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर सारंग कुलकर्णी, योगेश रामदास व तबल्यावर संतोष पुरी साथ देणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला असून रसिकांनी लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे. 

गायकांचा परिचय पुढीलप्रमाणे-

कुणाल भिडे

कुणाल भिडे हे बीई पदवीधर असून आयटी क्षेत्रात नोकरी करतात. संगीता बापट या त्यांच्या पहिल्या गुरु असून सध्या मुंबईमध्ये पं. महेश कुलकर्णी यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू आहे.

महेश कुलकर्णी

घरातूनच संगीताचा वारसा लाभलेल्या महेश यांनी वडील नारायणराव कुलकर्णी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर 14 वर्षे पं. कडलास्कर बुवा यांच्याकडून तालीम घेतली. विदुषी उषा चिप्पलकट्टी, पं शंकर अभ्यंकर यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळाले. संगीत अलंकार आणि संगीत विद्वत या पदव्या प्राप्त केल्या आहेत. पुणे, मुंबई, कोलकाता, बेंगळूर, म्हैसूर, हैदराबाद, नागपूर या ठिकाणी त्यांच्या मैफली झाल्या आहेत. शास्त्रीय गायनाबरोबरच भक्तिगीत, अभंग, गझल, नाटय़गीत, दासर पद हे गायन प्रकार तयारीने सादर करतात. अनेक बंदिशींचे ते रचनाकार असून संगीतकारदेखील आहेत. त्यांना सूरमणी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Related Stories

येळ्ळूर ग्रा.पं.वर म. ए. समितीचे वर्चस्व

Omkar B

तिसऱया रेल्वेगेटजवळ धाडसी दरोडा

Omkar B

बेळगावात 3 बाल कामगारांची सुटका : बालभवनमध्ये रवानगी

Omkar B

थकीत प्रोत्साहन धन तातडीने द्या, अन्यथा काम बंद

Patil_p

दौडमधून साकारतेय नवचैतन्य

Patil_p

बसस्थानकासमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी

Patil_p
error: Content is protected !!