तरुण भारत

डेप्युटी कमांडंट कर्नल व्ही.टी.स्वप्निल यांची लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रधान कार्यालयाला एमएलआयआरसीचे डेप्युटी कमांडंट कर्नल व्ही. टी. स्वप्निल यांनी सदिच्छा भेट दिली व लोकमान्य सोसायटीच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी व्ही. टी. स्वप्निल म्हणाले, प्रत्येक नागरिकाने आपले कार्य प्रामाणिकपणे केल्यास तीही खरी राष्ट्रभक्तीच होईल. प्रत्येकाने आपल्या परीने कार्य करून राष्ट्रनिर्मितीत आपला वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच लोकमान्यच्या विविध योजना व उपक्रमांची समाजबांधणीतील योगदानाबद्दल विशेष उल्लेख करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे यांनी डेप्युटी कमांडंट कर्नल व्ही. टी. स्वप्निल यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. निवृत्त कर्नल दीपक गुरुंग यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, प्रभाकर पाटकर, सीईओ अभिजीत दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, समन्वयक विनायक जाधव व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

समाजाचे हित साधते तेच खरे साहित्य!

Amit Kulkarni

शिक्षकांसाठी आजपासून विषयनिहाय कार्यशाळा

Patil_p

रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाला शानदार प्रारंभ

Rohan_P

कणकुंबी-पारवाड ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

Amit Kulkarni

कुवेतमधील 8 लाख भारतीय संकटात

Patil_p

साईराज वॉरियर्स, झेवर गॅलरी संघ विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!