तरुण भारत

मराठा संस्कृती संवर्धन संघटनेतर्फे रक्तदान शिबिर

प्रतिनिधी / बेळगाव

येथील मराठा संस्कृती संवर्धन या संघटनेच्यावतीने रविवारी रक्तदान शिबिर पार पडले. शनिमंदिर जवळील सेवक शॉपी येथे रविवारी सकाळी 9 ते 2 यावेळेत शिबिराचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाला डॉ. प्रियांका कुमार देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केएलई ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. श्रीकांत विरगी, तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिल चौधरी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब पाटील (व्ही. एन. पाटील) होते.

यावेळी डॉ. श्रीकांत विरगी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. तर प्रा. अनिल चौधरी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदात्याला याचा काय फायदा होतो. याची सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रियांका देसाई यांनी दातांची निगा याविषयी माहिती दिली.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिवराज चव्हाण-पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुजय शिंदे-पाटील यांनी केले. या रक्तदान शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सेक्रेटरी किशोर देसाई यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेची युवा आघाडी तसेच महिला मंडळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.

24- 17

Related Stories

केएलई डॉ.शेषगिरी कॉलेजमध्ये निवासी शिबिर

Amit Kulkarni

किसान रेल्वे बेळगावमध्ये दाखल

Patil_p

गरज वाहनांच्या प्रखर दिव्यांवर रोख घालण्याची

Patil_p

अशोक हावळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

अन् त्याला आहेत चक्क 24 बोटे…!

Omkar B

वन्यजीवांसाठी उद्योग खात्रीतून धरणाची निर्मिती

Patil_p
error: Content is protected !!