तरुण भारत

खानापुरात 112 क्रमांकाबाबत माहिती फलकांद्वारे जागृती

प्रतिनिधी / खानापूर

 पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारणासाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधल्यास तात्काळ मदत मिळेल. याबाबत जागृतीसाठी खानापूर शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या माहिती फलकांचे शुक्रवारी अनावरण झाले. पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी शिवस्मारक चौकातील फलक अनावरणावेळी या क्रमांकाबद्दल माहिती दिली. उपनिरीक्षक पाटील म्हणाले, यापूर्वी पोलीस, अग्निशमन दल व आपत्ती निवारणासाठी वेगवेगळे क्रमांक होते. पण यापुढे केवळ 112 या एकाच क्रमांकावर कॉल केल्यास पोलीस तात्काल घटनास्थळी पोहचतील. आगीची घटना घडल्यास अग्निशमन दल पोहचेल, महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपक्रम महत्त्वाचा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैलहोंगल विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर शिवानंद कट्टगी यांनी शुक्रवारी खानापूर मंडल, खानापूर आणि नंदगड पोलीस ठाण्यांना भेट दिली. त्यांनी येथील माहिती घेऊन अधिकाऱयांना सूचना केल्या. गुन्हय़ांचा विनाविलंब तपास लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक बसगौडा पाटील, उपनिरीक्षक यु. एस. आवटी यांचे अभिनंदन करून गुन्हेगारी थोपविण्याबाबत सूचना
केल्या.

Advertisements

Related Stories

ऊस वाहतूक करणाऱया वाहनांची रिफ्लेक्टर तपासणी

Patil_p

नाथ पै चौक रस्ताकामामुळे नागरिकांची गैरसोय

Amit Kulkarni

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार

Patil_p

टिळकवाडी येथे बेकायदा दारू जप्त

Patil_p

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा

Amit Kulkarni

जिल्हय़ात ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या 43

Amit Kulkarni
error: Content is protected !!