तरुण भारत

‘त्या’ मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

रविवारी चचडी क्रॉसजवळ भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चौघा जणांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदाशिवनगर व शहापूर स्मशानभूमीत चारही मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाला. पोलीस दलाच्यावतीनेही मानवंदना देण्यात आली.

येथील महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी नलवडे-पवार (वय 60), त्यांचा मुलगा प्रसाद वासुदेव पवार (वय 29), त्याची पत्नी अंकिता प्रसाद पवार (वय 25) तिघेही राहणार सहय़ाद्रीनगर व अंकिताची आत्या दीपा अनिल शहापूरकर (वय 38) रा. हट्टीहोळ गल्ली, शहापूर हे जागीच ठार झाले होते.

उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून चारही मृतदेह रविवारी रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी लक्ष्मी नलवडे यांचा मुलगा व सुनेचा मृतदेह सहय़ाद्रीनगर येथील निवासस्थानी नेण्यात आला तर दीपा शहापूरकर यांचा मृतदेह शहापूरला नेण्यात आला.

त्यांच्या निवासस्थानासमोर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, चंद्रशेखर निलगार, एसीपी के. चंद्राप्पा, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील आदींसह पोलीस दलातील अनेक अधिकाऱयांनी पुष्पचक्र वाहून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर सदाशिवनगर स्मशानभूमीत या तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील दीपा शहापूरकर या सध्या भाग्यनगर परिसरात आपल्या कुटुंबीयांसह राहात होत्या. नवदांपत्यासमवेत त्याही देवदर्शनासाठी सौंदत्तीला गेल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासू, दीर, भावजय, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

सांगली वृत्तपत्र विपेता संघटनेची तरुण भारतला सदिच्छा भेट

Patil_p

खडा पहारा उपक्रमासाठी वडगावमध्ये जागृती

Amit Kulkarni

ग्रामीण भागात अघोषित वीजकपात

Amit Kulkarni

बैलूर येथे दोन वाघांचे दर्शन

Patil_p

मालमत्ताधारकांना 31 मे पर्यंत पाच टक्के कर सवलत मिळणार

Patil_p

निपाणी पालिकासभेत लोकशाही पायदळी

Omkar B
error: Content is protected !!