तरुण भारत

हलग्याजवळ अपघातात गवंडी कामगाराचा मृत्यू

आणखी एक जखमी, हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

टाटा येस व मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन मोटारसायकलवरील गवंडी कामगाराचा मृत्यू झाला तर आणखी एक जण जखमी झाला आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलग्याजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

गंगाराम रामचंद्र तुक्काण्णाचे (वय 58) रा. देवगणहट्टी-धामणे असे या दुर्दैवी गवंडी कामगाराचे नाव आहे. मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेला मनोहर नारायण मुरकुटे (वय 63) रा. येळ्ळूर हाही जखमी झाला आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

गंगाराम व मनोहर हे दोघे मोटारसायकलवरून नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी गेले होते. रक्षाविसर्जन आटोपून गावी परतताना टाटा येस व मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन गंगाराम गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.

Related Stories

चारा, पाणी प्रश्नाबाबत आतापासूनच काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालयावरुन उडी घेण्याचा एकाचा प्रयत्न

Patil_p

ग्राम पंचायत निवडणूक, क्लब रोडवर वाहतूक बंदी

Patil_p

महापौर निवड कोणत्या आरक्षणानुसार?

Omkar B

वैशाली कुलकर्णी यांना पीएचडी

Patil_p

आयटीबीपीच्या आणखी 7 जवानांना कोरोना

Patil_p
error: Content is protected !!