तरुण भारत

गोवा माईल्स, ऍप टॅक्सी परवानगी त्वरीत रद्द करा

टुरिस्टटॅक्सीसंघटनेचीमागणी

प्रतिनिधी/ फोंडा

Advertisements

राज्यात गोवा माईल्स व ऍप आधारीत टॅक्सींना दिलेली परवानगी सरकारने त्वरित रद्द करून त्यासंबंधी वाहतूक खात्याने जारी केलेले आदेश मागे घ्यावा, अशी मागणी गोवा टय़ुरिस्ट टॅक्सी मालक संघटना व पिवळी काळी टॅक्सी संघटनेने केली आहे. राज्यातील काही मंत्री व आमदार स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा गोवा माईल्स सारख्या टॅक्सी व्यावसायाला समर्थन देत आहेत, असा आरोप फर्मागुडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडे गाऱहाणी ऐकण्यास वेळच नाही

कोरोना महामारीमुळे आधीच टॅक्सी व्यावसाय अडचणीत आला असून सरकारच्या या धोरणामुळे गोव्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसाय कायमचा देशोधडीला लागेल, असे संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी सांगितले. राज्यातील टॅक्सी मालक संघटना गेल्या तीन वर्षांपासून गोवा माईल्स व ऍप आधारीत टॅक्सी व्यावसायाला विरोध करत आहेत. सरकार आमचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी उलट या व्यावसायाची बदनामी करीत आहे, असा आरोप कामत यांनी केला. राज्यात सध्या हजारभर गोवा माईल्स टॅक्सी कार्यरत असून त्यावर काम करणारे सर्व चालक बिगर गोमंतकीय आहेत. त्यांच्याकडे चालकांना लागणारा बॅच नाही, कामाच्या वेळमर्यादाही ते पाळत नाहीत. वाहतूक खात्याकडे त्यासंबंधी तक्रारी करूनही कोणतीच होत नाही. स्थानिक टॅक्सीवाल्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अधिकृतरित्या वेळ मागूनही ते भेट देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

मेळवलीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काय चुकले ?

शेळ मेळावली येथील आयआयटी विरोधी स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल पराशय खोत यांनी टॅक्सी संघटनेवर केलेल्या टिकेला उत्तर देताना,  गोमंतकीय जनतेच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या लढय़ाला पाठिंबा देणे यात काहीच चूक नसल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार कोळसा वाहतूक, दुपदरी रेल्वे मार्ग व अन्य प्रकल्प आणून जनतेला वेठीस धरत आहे. त्यांना विरोध झालाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मायकल लोबो दुटप्पी

कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो हे स्थानिक टॅक्सी संघटनेच्या पाठिशी असल्याचे ढोंग करीत असून प्रत्यक्षात ट्रव्हल ऍण्ड टय़ुरिझम असोसिएशने तेच पडद्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप कामत यांनी केला. स्थानिक टॅक्सीवाल्यांना माफिया म्हणणाऱया लोकप्रतिनिधींनी आपले काळे व बेकायदेशीर धंदे आधी बंद करावेत, असा इशाराही संघटनेचे सरचिटणिस गंगाराम फडके यांनी दिला. संघटनेचे सहसचिव फुरखान शाह यांनी टॅक्सींना मिटर बसविण्यात विरोध नसल्याचे सांगून देशभर कुठेही टय़ुरिस्ट टॅक्सींना ही सक्ती नसल्याने गोव्यातच का? असा प्रश्न उपस्थित केला. काही मंत्री गोवा माईल्स सारख्या एजंटकडून कमिशन खाऊन बाहेरच्या टॅक्सींना गोव्यात आणू पाहत आहेत. कोरोना महामारीच्या काळात हा व्यावसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यावेळी सरकारकडून कुठलाच दिलासा मिळाला नाही. मात्र कॅसिनो व्यावसायाला रु. 1 कोटी 77 लाख माफ करण्यात आले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व सरकारी खात्यामधील वाहने बंद करून टॅक्सी व्यावसायिकांची वाहने त्यात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विद्यमान सरकार स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांसाठी काही न करता उलट आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गोवा माईल्स सारख्या ऍप आधारीत टॅक्सी गोव्यात आणून स्थानिक टॅक्सी व्यावसाय कायमचा संपवू पाहत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पिवळी काळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सुनील नाईक म्हणाले, टॅक्सी व्यावसाय गेले आठ नऊ महिने अडचणीत होता, त्यावेळी सरकारने कुठलीच आर्थिक मदत केली नाही. सरकारने आधी टॅक्सी चालकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्यासाठी राज्यातील टॅक्सी चालकांचा मेळावा भरवून आमची गाऱहाणी ऐकून घ्यावीत, अशी मागणी केली. गोवा माईल्स टॅक्सींना दर देण्याचा पर्यटन खात्याला कुठलाच अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी बबन सावंत, प्रेमानंद गावडे, संदेश नाईक व रामदास नाईक हे उपस्थित होते.

Related Stories

गोव्यात देशी पर्यटन शक्य

tarunbharat

प्रखर हिंदुत्ववादी अवधुत कामत यांचे निधन

Omkar B

तीन लाख मतदार बजावणार मतदानहक्क

Amit Kulkarni

‘तरुण भारत’बद्दल मुख्यमंत्र्यांची आक्षेपार्ह टीका

Omkar B

लॉकडाऊन फेल, निर्बंधानी काय होणार?

Amit Kulkarni

मुरगावांत भाजपाविरोधी 1400 मते मतदार यादीतून गाळण्याचे प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!