तरुण भारत

दोन पोलीस व होमगार्डना राष्ट्रपती पदके जाहीर

प्रतिनिधी/ पणजी

यंदाच्या राष्ट्रपती पदकांसाठी गोवा पोलीस खात्यातील दोन पोलीस कर्मचारी व दोन होमगार्डची निवड झाली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांचा समावेश असून सध्या ते पोलीस खात्याच्या वाहतूक विभागात दक्षिण गोवा उपअधीक्षक म्हणून काम करीत आहेत. निरीक्षक रवींद्र देसाई यांचाही राष्ट्रपदी पदकात समावेश असून ते सध्या कुडचडे पोलीस स्थानकात निरीक्षक म्हणून काम करीत आहेत.

उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांना यापूर्वी 2012 साली मुख्यमंत्र्यांचे पोलीस पदक प्राप्त झाले आहे. 1993 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून गोवा पोलीस खात्यात रुजू झालेले शिरवईकर यांनी नासिक पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट गोवा पोलीस खात्यात आपली डय़ुटी सुरु केली होती.

अवघ्या 7 वर्षात त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आणि या काळात त्यांनी मडगाव, मायणा-कुडतरी, हणजुणे, फोंडा आणि केपे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून काम केले. 2012 साली त्यांना मुख्यमंत्र्यांचे पोलीस पदक प्राप्त झाले. त्यानंतर अवघ्या 3 वर्षांत म्हणजे 2015 साली त्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून बढती मिळाली. या काळात त्यांनी आपल्या कामाची खासियत खात्याला दाखवून दिली आणि त्याची पावती म्हणून शिरवईकर यांना यंदा राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.

नयन वेलिंगकर

राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेल्या होमगार्डमध्ये नयन वेलिंगकर उर्फ विजया विजय मातोंडकर हिचा समावेश आहे. त्या 1998 मध्ये होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. गेली 31 वर्षे सेवा बजावताना त्यांनी अनेकवेळी विविध क्रीडा स्पर्धातून प्राविण्या मिळविले आहे. 2013 साली त्यांनी मुख्यमंत्री पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. मिनाक्षी अनंत कुबल यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्या 1984 साली होमगार्ड सेवेत रुजू झाल्या आणि गेली 36 वर्षे सेवा बजावत आहेत. प्रत्येकवेळी त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना बढती देण्यात आली असून सध्या त्या प्लॅटून कमांडर म्हणून काम करीत आहेत. 2009 साली त्यांना मुख्यमंत्री पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे.

Related Stories

माटोळी बाजार भरण्याचे काणकावासीयांकडून स्वागत

Patil_p

कोलवा पंचायतीकडून रस्त्याच्या बाजूच्या गाडय़ांची पाहणी

Patil_p

फोंडा पालिकेवर भाजपाचे संख्याबळ दहा होणार

Patil_p

होंडा येथील ‘हिंदुस्तान एरोनॉटिकल’ चार वर्षापासून बंदच

Amit Kulkarni

पंचायती लोकप्रतिनिधी, गोवा फाऊंडेशन नव्हे!

Patil_p

गोमंतक मराठा समाजाच्या कलाकारांचे योगदान फार मोठे पं. कमलाकर नाईक यांचे उद्गार

Omkar B
error: Content is protected !!