25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

‘अडीच वर्षां’च्या चिमुरडीसह सातारच्या युवकाने केले ‘कळसुबाई’ सर


सातारा / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर केला प्रजासत्ताकदिन साजराप्रजासत्ताक दिनाचे साधले औचित्य -दिली कोविड योद्धे आणि भारतीय जवानांना मानवंदना गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारे महाराष्ट्रातील १६४६ मीटर उंची असलेल्या कळसूबाई शिखरावर चढाई करून सातारा जिल्ह्यातील कुमठे या गावचे गिर्यारोहक रोहित वानिता शांताराम जाधव आणि मंचर येथील अडीच वर्षे वय असणारी मुद्रा अर्चना प्रशांत करंडे या चिमुकलीने 6 तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर सर केले.

रोहित शांताराम जाधव असे कळसूबाई शिखर सर केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मूळचा साताऱ्याचा असून, नोकरी निमित्त भोसरी मद्ये स्थायिक आहे .रोजच्या धकाधकीच्या जीवनात गिर्यारोहनाची आवड जोपासली असून , वजीर, लिगांणा , नवरी सुळखा, सारखे अवघड सुळके त्यांनी सर केले आहेत. तसेच राजगड ,रायगड , वर्धनगड, जंजिरा , सिंधुदुर्ग असे किल्ल्याची भटकंती केली आहे.

त्याचबरोबर मुद्रा करंडे ही अवघ्या अडीच वर्षाची चिमुकली ही आंबेगाव बुद्रुक ,मंचर या गावची आहे. मुद्रा ची आई ही व्याख्याती आहे.तसेच सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असते गडकिल्ले संवर्धन या कार्यात त्या अग्रेसर असतात. मलाही गडकिल्ले संवर्धन, आणि सामाजिक कार्याची ,तसेच गिर्यारोहणाची आवड आहे.मुद्रा ची आई आणि माझी ओळख गडकिल्ले संवर्धन या माध्यमातून झाली.तसेच मी गिर्यारोहण क्षेत्रात जे काम करतो ते पाहून मुद्रा ची आई म्हणाली माझ्या मुद्रा ला पण गडकिल्ले पाहण्याची खूप आवड आहे.मुद्रा ने आत्ता पर्यंत मुद्रा ने ७ किल्ले सर केले आहेत. यात रायगड,शिवनेरी,जंजिरा,हडसर,निमगिरी,पद्मदुर्ग,नारायणगड असे किल्ले आहेत.ती नेहमी माझ्या सोबत असते.मग आम्ही ठरवले की आपण मुद्रा सोबत एकदा एकत्र ट्रेक करूया आणि अखेर तो दिवस आला आणि आम्ही कळसूबाई हे शिखर निवडले.माझ्या मनात जरा धकधक होती पण मुद्रा चा जो उत्साह होता तो खरंच खूप भारी होता. आणि तिला पाहून आमची सर्व टीम पण जोमाने शिखरावर चढाई करत होती.

महाराष्ट्रातील कळसूबाई हे तब्बल १६४६ मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित करणारी ही चिमुरडी आहे मंचर येथील मुद्रा करंडे. ४ तासांच्या मोहिमेत मुद्रा ने कळसूबाई शिखर सर करण्याबरोबरच परतीचा प्रवास पूर्ण करत शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. तिच्या बरोबर या मोहिमेत कॅमेरामन सोमनाथ फंड, मचु शिर्के, गहिणी शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.अमोल दादा जाधव,सुयश घेवरी ,प्रशांत करंडे यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रात कळसूबाई शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या अनेक मोठ्या मोहिमांपूर्वी गिर्यारोहक कळसूबाई सर करण्याचा सराव करतात. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो. मुद्रा हिने गिर्यारोहक रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाईची मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली.

या मोहिमेबाबत जाधव म्हणाले कळसूबाई चढण्याचा अनुभव थरारक होता. मुद्रा बरोबर तिचे पालकही या मोहिमेत सहभागी झाले होते. बारी या रस्त्याद्वारे मोहिमेला सुरुवात झाली. पहाटे ५ वाजता ते सकाळी ८ वाजताच्या सुमारास चढाईला सुरुवात झाली. वाजताच्या सुमारास कळसूबाईच्या मोहिमेवर फत्ते मिळविली. ४ वाजेपर्यंत ते खाली परतले असे जाधव यांनी सांगितले. या मोहिमेदरम्यान थंड वारा आणि रणरणते ऊन होते तर परतीच्या वेळी दाट अंधार होता. मात्र मुद्रा ने कुठेही न डगमगता मोहिम यशस्वीपणे पार केली.

Related Stories

यवतेश्वर परिसरात मानवी सांगडा सापडल्याने खळबळ

Patil_p

सातारा : वाठार स्टेशनमध्ये अवतरलं काश्मीर

datta jadhav

सातारा : कास परिसरात वनसंपदेची होरपळ

datta jadhav

अजिंक्याताऱयावर प्रथमच शिवजयंतीचा अनोखा महोल

Patil_p

कराडजवळ अपघातात तीन ठार

triratna

सातारा : सदर बाजार येथे गटारीत कचरा टाकल्याने पालिका कर्मचाऱ्यांची दमछाक

triratna
error: Content is protected !!