तरुण भारत

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या यशवंत गणपती भालकर ( रा.पाचगांव, ता.करवीर) यांना पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांची धावपळ उडाली. भालकर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.


याबाबत अधिक माहिती अशी, यशवंत गणपती भालकर यांनी राहत्या घराच्या समोर रहदारीस वहिवाटीकरीता रस्ता मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. परंतु आपल्याला न्याय मिळत नाही या भावनेतून त्यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त व अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.


सकाळी पावणे दहाच्या सुमारास भालकर हे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले. त्यांनी सोबत आणलेल्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांची धावपळ उडाली. येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी भालकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रॉकेलचा कॅन काढून घेतला. यामुळे पुढील अनर्थ टळला. येथून भालकर यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान दस्तगिर मुल्ला, महेश पाटील, रज्जाक मुल्लानि, रमेश जाधव, विशाल चौगुले, प्रतिक ठमके आदींनी आत्मदहनाचा प्रयत्न रोखण्याची कारवाई केली.

Related Stories

कोल्हापूर : विनापरवाना मोबाईल प्रदुषण तपासणी व्हॅनकडून दुचाकीवाल्यांची लूट

triratna

कोल्हापूर : समर्थ साकारणार ‘बाल जोतिबा’ची भूमिका

triratna

कोल्हापूर : भोगावती कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांचा राजीनामा

triratna

कंदलगाव, नागांव मार्गावर धावणार केएमटी

triratna

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता

triratna

गुलाब कोमेजला… दहा वर्षात पहिल्यांदाच नीचांकी दर

triratna
error: Content is protected !!