तरुण भारत

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर / प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या यशवंत गणपती भालकर( रा.पाचगांव, ता.करवीर) यांना पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांची धावपळ उडाली. भालकर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी, यशवंत गणपती भालकर यांनी राहत्या घराच्या समोर रहदारीस वहिवाटीकरीता रस्ता मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. परंतु आपल्याला न्याय मिळत नाही या भावनेतून त्यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त व अग्निशमन दलाचा बंब, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.

सकाळी पावणे दहाच्या सुमारास भालकर हे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले. त्यांनी सोबत आणलेल्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांची धावपळ उडाली. येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी भालकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रॉकेलचा कॅन काढून घेतला. यामुळे पुढील अनर्थ टळला. येथून भालकर यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान दस्तगिर मुल्ला, महेश पाटील, रज्जाक मुल्लानि, रमेश जाधव, विशाल चौगुले, प्रतिक ठमके आदींनी आत्मदहनाचा प्रयत्न रोखण्याची कारवाई केली.

Related Stories

याद राखा… तर हा संभाजीराजे आडावा येईल!

Abhijeet Shinde

कोरोना, महापुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे : आ. पी एन पाटील

Abhijeet Shinde

..अन् मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीत दिवसभर पोलीस बंदोबस्त

Abhijeet Shinde

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दलालांपासुन मुक्त केले : सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde

`ईएसआयसी’साठी दहा कामगारांची अट रद्द करा

Sumit Tambekar

कोल्हापूर : कागल, मुरगूड, गडहिंग्लज शहरे स्वच्छतेत देशात अव्वल बनतील – मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!