तरुण भारत

‘ऍपल’वाढविणार आयफोन-आयपॅडचे उत्पादन

चालू तिमाहीत पहिला 5-जी स्मार्टफोन तयार होण्याचा अंदाज

नवी दिल्ली

Advertisements

चीनला ऍपलकडून आणखीन एक झटका दिला असून यामध्ये ऍपल कंपनीने आयफोन, आयपॅड, मॅक आणि अन्य उत्पादनांची निर्मिती चीनच्या बाहेर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपॅडचे उत्पादन चालू वर्षाच्या मध्यापर्यंत व्हिएतनाममध्ये सुरु होणार आहे. यामध्ये असे मानले जात आहे, की प्रथमच चीनच्या बाहेर मोठय़ा संख्येने टॅबलेटसह अन्य उत्पादनांची निर्मिती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कॅलिफोर्निया येथे स्थिर असणारी कंपनी भारतामध्ये आयफोनचे उत्पादन वाढविण्यावर विचार करत आहे. कंपनीकडून आयफोन 12 आवृत्ती फोनचे उत्पादन चालू तिमाहीत सुरु करण्याचा विचार सुरु असून हा कंपनीचा पहिला 5-जी स्मार्टफोन राहणार असल्याची माहिती आहे. ऍपल आपले स्मार्ट स्पीकर्स, इअरफोन आणि कॉम्प्युटर निर्मिती क्षमतेमध्येही दक्षिण पूर्व आशियात काही विभागात हिस्सेदारी वाढविण्याचा विचार करत आहे.

Related Stories

मागणीत वाढ, शोभा डेव्हलपर्सला फायद्याची

Patil_p

अनेक ग्राहकांचा कल आता क्रेडिट कार्डकडे

Amit Kulkarni

झोमॅटोचा पुरवठा पूर्वपदावर आल्याचा दावा

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांनी 20,574 कोटी गुंतवले

Patil_p

नवीन लेबर कोड एप्रिलपासून लागू होणार ?

Amit Kulkarni

टीसीएस कंपनीचा बायबॅक झाला खुला

Patil_p
error: Content is protected !!