तरुण भारत

पर्यावरणासाठी पालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर पर्यावरणयुक्त करण्यासाठी हरीत ठेवण्यासाठी वसुंधरा अभियानातंर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सातारा पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद सातारकरांनी दिला. दरम्यान, नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सातारा शहरात पालिकेच्यावतीने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सर्व सातारकरांचा सहभाग महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisements

सातारा पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, माजी उपाध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, राजू भोसले, ज्ञानेश्वर फरांदे, अशोक मोने, शकिल बागवान, प्राची शहाणे, रजनी पवार आदी मान्यवर उपस्थि होते. यावेळी सायकल रॅली राजवाडा येथून देवु चौक पोवई नाका मार्गे पुन्हा राजवाडा अशी काढण्यात आली. यावेळी बोलताना नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, सातारा पालिकेच्यावतीने वसुंधरा अभियानानिमित्ताने राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये सायकल रॅली हा एक उपक्रम आहेत. त्याचबरोबर स्वच्छ वॉर्ड अभियानही राबवण्यात येणार आहे. तसेच शहरात प्लास्टिक बंदीची चळवळ म्हणून प्लास्टिक बाटलीत साठवून त्या बाटल्या पालिका विकत घेणार आहेत. त्यापासून विटा बनवून त्या विक्री करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

गड्या आपली झेडपीचीच शाळा बरी

Abhijeet Shinde

मांढरदेव घाटात दरड कोसळली

Patil_p

मांढरदेव घाटात दरड कोसळली, दरड हटवून वाहतूक केली सुरळीत

Abhijeet Shinde

विधानसभा अध्यक्षाची निवड याच अधिवेशानत आणि तो काँग्रेसचाच होणार – बाळासाहेब थोरात

Abhijeet Shinde

‘त्या’ ग्रामपंचायतींची खाती सुरू करा अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार

Sumit Tambekar

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 60,226 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!