तरुण भारत

कुडाळमधील मृत कोंबडय़ांचा बर्ड फ्लू अहवाल नेगिटिव्ह

प्रतिनिधी/ कुडाळ

 जावळी तालुक्यातील कुडाळ याठिकाणी शेख वाडय़ात गेल्या आठवडय़ात काही कोंबडय़ा मृत झाल्या होत्या. मृत कोंबडय़ा पुणे येथुन राष्ट्रीय उच्च सुरक्षा संस्थान एवीयन इंफुएन्झा ओ. आई. ई. संदर्भ प्रयोगशाळा भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. या मृत कोंबडय़ांचा बर्ड फ्लू अहवाल नेगिटिव्ह आला असून नागरिकांनी भीती बाळगू नये, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. विवेक इटनकर यांनी दिली.

Advertisements

 बर्ड फ्लू आजाराबाबत भीती न बाळगता योग्य ती काळजी घ्यावी. तसेच साधारण मरतुकी आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. याबाबत नुकतीच कुडाळ येथे कुक्कुटपालन व्यासायिकांसाठी बर्ड फ्लू आजाराबाबत तांत्रिक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बर्ड फ्लू आजाराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले आहे. योग्य काळजी घेतल्यास याचा प्रतिबंध करणे शक्य आहे. नागरिकांनी याबाबत भीती घेऊ नये, असे आवाहन जावली पशुवैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Stories

”गेली ७५ वर्षे कलम ३७० होते, तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती काय ?”

Sumit Tambekar

गुंड अभिनंदन झेंडे टोळी दोन वर्षे तडीपार

Omkar B

सातारा : उमेदवारांनी खर्चाची माहिती True Voter App मध्ये भरणे अनिवार्य

datta jadhav

आरक्षणावर मंत्री नारायण राणे, दानवे गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

Abhijeet Shinde

कृष्णा कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला

Patil_p

ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर दिल्लीत यलो अलर्ट जारी; शाळा, चित्रपटगृहे बंद

Sumit Tambekar
error: Content is protected !!