तरुण भारत

घंटा वाजली अन् मुलांचे चेहरे खुलले…

तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेला प्रारंभ,

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

कोरोनामुळे तब्बल 10 महिने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बंद होते. राज्य शासनाच्या निर्णयामुळे सातारा शहरासह जिह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. शाळांची घंटा खणाणली अन् मुलांच्या चेहरे आनंदाने खुलले. आपल्या मित्र-मैत्रिणीला पहायला मिळणार असल्याने सर्वांना आतुरतला लागली होती ती अखेर बुधवारी संपुष्टात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या शाळेमध्ये मुलांची काळजी घेतली जात होती. विशेष म्हणजे गुरुकुल स्कूलमध्ये खास करुन मुलांच्या हातात मोजे, डोक्यावर प्लास्टिकची टोपी दिसत होती. तसेच वर्गशिक्षकच पालक बनून ज्ञानार्जनाचे काम करत होते.

शाळेत आपले मित्र, शाळेतले शिकवणारे शिक्षक, शाळेचे मैदान या सगळयाचा गेल्या दहा महिन्यापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विसर पडला होता. मुलांना शिक्षण हे मोबाईल, संगणकावर घराच्या घरीच दिले जात होते. तब्बल दहा महिन्यानंतर शहरासह जिह्यातील शाळांची घंटा खणाणली. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांच्या मनात भीती होतीच. तरीसुद्धा मुलांना पाठवण्यासाठी सकाळपासून पालकांची घाई दिसत होती. अगोदरच मुलांचे दप्तर, शाळेचे साहित्य, ड्रेस तयार करुन मुलांना जाताना पालकांनी आर्वजून मास्क, सॅनिटायझरची बाटली दप्तरात दिली होती. शाळेत मुलांना पोहचवण्यासाठी पालकांची गर्दी दिसत होती. शाळेच्या बाहेर शाळा व्यवस्थापनाने सोशल डिस्टन्स पाळूनच एकेका मुलांना टेम्परेचर चेकींग करुन आतमध्ये घेतले जात होते. हातावर सॅनिटायझर देवून प्रत्येक बाकावर एकेकच विद्यार्थी बसवण्यात येत होते. वर्गीशिक्षकांच्यावरच विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली होती. आज पहिल्या दिवशी मोजकेचे तास शिकवून  विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

Related Stories

वाई पोलिसांकडून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

datta jadhav

अवघ्या तीन तास चाळीस मिनिटांमध्ये 1008 योग सूर्यनमस्कार घालून डोळ्याचे पारणे फेडले

Abhijeet Shinde

विनापरवाना भाजी विक्री करणाऱ्यांवर सातारा पालिकेचा कारवाईचा बडगा

Abhijeet Shinde

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपच जबाबदार”

Sumit Tambekar

खानापूर तालुक्यातील 65 गावांचा सर्व्हे पूर्ण

Abhijeet Shinde

बार्शीत जिल्हाधिकारी यांचा घरपोच गॅसचा आदेश वाऱ्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!